Rishabh Pant Injured: भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला कसोटी समान आज खेळला गेला. आज भारताची कामगिरी ही निराशा जनक होती. त्यात गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाच्या(Ravindra Jadeja) बॉलवर ऋषभ पंत जखमी (Rishabh Pant Injured) झाला आहे. विशेष म्हणजे ही दुखापत त्याला त्याच गुडघ्यावर झाली (Knee Injury)आहे. ज्या गुडघ्यावर त्याला अपघातावेळी दुखापत झाली होती. त्यामुळे पंत उद्या मैदानात दिसेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात अजून दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे पंतच्या दुखापतीने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. यानंतर पुढील महिन्याच्या शेवटी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियालाही जायचे आहे. जिथे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. असं असलं तरी ऋषभ पंत बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे आहे.
RISHABH PANT IS WALKING BACK...!!!
- Jurel to keep wickets. pic.twitter.com/LlJjkjBH3w
— Johns. (@CricCrazyJohns) October 17, 2024
डिसेंबर 2022 मध्ये जेव्हा पंतला कार अपघातात गंभीर दुखापत झाली होती, तेव्हा त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती, अशी माहिती आहे. मात्र, त्याच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंतच्या जागी ध्रुव जुरेल मैदानात उतरला असून तो यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. (हेही वाचा: Devon Conway Catch Video: बिबट्यासारखी दाखवली चपळता, उडी मारत डेव्हन कॉनवेने घेतला अप्रतिम झेल, सरफराज खान राहिला बघत)
Hopefully everything is fine 🤞
Rishabh Pant felt discomfort in his knee after he was hit and was carried off the field. pic.twitter.com/StBD1QYPng
— CricXtasy (@CricXtasy) October 17, 2024
न्यूझीलंडच्या डावाच्या 37व्या षटकाच्या हा अपघात झाला. रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता, समोर न्यूझीलंडचा डवान कॉनवे होता. आणि जडेजाचा चेंडू थेट पंतच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला लागला. चेंडू लागताच पंत मैदानावर झोपला आणि जोरात ओरडू लागला. सामना थांबवण्यात आला आणि पंतला पाहण्यासाठी भारतीय संघाचे फिजिओ धावतच मैदानात आले. पंतला नीट उभेही राहता येत नव्हते.