पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. बांग्लादेशने जिंकलेला हा पाकिस्तानविरोधातील पहिलाच कसोटी सामना होता. पहिल्या डावात पाकिस्तानने 4 विकेट गमावून 450 पेक्षा अधिकची धावसंख्या उभारल्यानंतर देखील डाव घोषीत करणे पाकिस्तानला महागात पडले होते. या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात आता बांग्लादेश पाकिस्तानला रोखण्यात यशश्वी होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  नजमुल हुसेन शांतोच्या (Nazmul Hussain Shanto) नेतृत्वाखाली बांगलादेशचा संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे नेतृत्व शान मसूद  (Shan Masood) करत आहे.  (हेही वाचा - How To Watch PAK vs BAN, 2nd Test Live Streaming India: पाकिस्तान-बांगलादेश यांच्यात आजपासून खेळवला जाणार दुसरा कसोटी सामना, चाहते येथे पाहू शकता लाइव्ह)

दरम्यान रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटीत स्लो ओव्हररेटमुळे पाकिस्तानचे 6 गुण आणि बांगलादेशचे 3 गुण वजा केले जातील असा निर्णय आयसीसीने दिला आहे. यामुळे आजच्या सामन्यात ओव्हररेट ठिक राखण्याचे दोन्हीसंघापुढे आव्हान असणार आहे.

आहे

बांगलादेशने पहिल्या कसोटीत 10 गडी राखून विजय मिळवला होता. बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील हा पहिला विजय ठरला. नझमुल हशन शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने मालिकेतील दुसरी कसोटी जिंकली किंवा अनिर्णित ठेवली तर ते कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकेल. पाकिस्तानने बांगलादेशला 5 कसोटी मालिकेत पराभूत केले आहे.

दुसऱ्या कसोटीत हे मोठे विक्रम केले जाऊ शकतात:

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम कसोटी क्रिकेटमध्ये सतत संघर्ष करत असून गेल्या 12 डावांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. बाबर आझमने आपल्या कारकिर्दीत 53 कसोटी सामन्यांमध्ये 3920 धावा केल्या आहेत. बाबर आझमला 4000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी 80 धावांची गरज आहे आणि अशी कामगिरी करणारा तो 12वा पाकिस्तानी खेळाडू ठरणार आहे.

बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने आपल्या कसोटी कारकिर्दीत 1497 धावा केल्या आहेत. नझमुल हुसेन शांतोला 1500 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी फक्त तीन धावांची गरज आहे आणि तो अशी कामगिरी करणारा 12 वा बांगलादेशी फलंदाज ठरणार आहे.

बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 707 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजन सिंगला (711) मागे टाकण्यासाठी शाकिब अल हसनला पाच विकेट्सची गरज आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा 15वा खेळाडू बनू शकतो.

जर मुशफिकुर रहीमने दुसऱ्या कसोटीत 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर तो तमीम इक्बालला (15249) मागे टाकेल आणि बांगलादेशसाठी इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.

कसोटी क्रिकेटमध्ये शकीब अल हसनने आतापर्यंत 19 अर्धशतकांसह 241 बळी घेतले आहेत. शाकिब अल हसनला स्टुअर्ट ब्रॉड, डॅनियल व्हिटोरी आणि ॲलन डोनाल्ड यांच्या विक्रमांशी बरोबरी करण्यासाठी आणखी एका अर्धशतकाची गरज आहे.