पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवान (Photo Credit: Twitter)

कोविड-19 प्रभावित काळात क्रिकेट खेळणे सध्या कठीण झाले आहे. प्रत्येक मालिका सुरु होण्यापूर्वी क्वारंटाईन ठेवण्याची प्रक्रिया तसेच बायो-बबलमुळे (Bio-Bubble) खेळाडूंची परीक्षा घेत आहे. अनेक खेळाडू याबाबत उघडपणे पुढे येत नाही आणि ब्रेकची मागणी करत नसले तरी पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेटपटू मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याला अपवाद ठरला आहे. बायो-बबलमधील जीवनाला कंटाळलेल्या पाकिस्तानच्या कसोटी उपकर्णधाराने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) 2021 टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेपूर्वी ब्रेक मागितला आहे. “सर्व वेळ बायो-बबलमध्ये राहणे सोपे नाही आणि आम्ही गेल्या वर्षात खूप क्रिकेट खेळलो आहोत. हे आमच्यासाठी चांगले आहे परंतु त्याच वेळी ते खेळाडूंवर मानसिक ताण देखील बनते,” रिझवान एका व्हर्च्युअल सत्रादरम्यान म्हणाला.

विकेटकीपर-फलंदाज रिझवान म्हणाला की, वरिष्ठ खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेसाठी ताजेतवाने होणे गरजेचे आहे, जे संयुक्त अरब अमिराती व ओमान येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. पाकिस्तान सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. पहिल्या सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने गेले नाही पण रिझवान दुसऱ्या कसोटीत संघाने पुनरागमन करण्यासाठी आशावादी असला तरी तो म्हणाला की 2-सामन्यांच्या मालिकेत नवीन खेळाडूंना स्वतःची चाचणी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. रिझवान म्हणाला की, अलीकडच्या काळात लहान दोन कसोटी मालिका खेळणे संघासाठी आव्हानात्मक आहे कारण खेळाडूंना योग्य तयारी आणि त्यांचा न्याय करणे कठीण आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी 20 ऑगस्टपासून सबिना पार्क येथे सुरु होत आहे.

पाकिस्तानी क्रिकेट सर्कलमध्ये टीका होत असल्यामुळे पाहुणा संघ सध्या मालिकेत कमबॅक करून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या निर्धारित असेल. “आता आमचा मुख्य फोकस दुसरा सामना जिंकून आणि त्यातून समान गुण मिळवून मालिका बरोबरीवर ठेवणे आहे.” वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेनंतर पाकिस्तान अफगाणिस्तानविरुद्ध मर्यादित ओव्हरची मालिका देखील आयोजित करणार आहे. सर्व सामने 3 सप्टेंबरपासून श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे खेळले जातील.