ICC Champions Trophy 2025 (Photo Credit - X)

ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 2025 (ICC Champions Trophy 2025) 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात कराची (Karachi) येथे होणार आहे. आता ही स्पर्धा सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे, परंतु अद्यापपर्यंत पाकिस्तानमधील स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत. काही स्टेडियममध्ये आऊटफिल्ड आणि खेळपट्ट्यांचे काम अद्याप बाकी आहे. यानंतर एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, पाकिस्तानमधील स्टेडियम कधी तयार होतील?

स्टेडियम अद्याप तयार नाही

मिळालेल्या माहितीनुसार “आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यासाठी फक्त एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. पाकिस्तानची ठिकाणे वेळेच्या विरुद्ध शर्यतीत आहेत. कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथील स्टेडियम अद्याप तयार नाहीत, ते 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायचे होते, पण ते अद्याप ते काय झाले नाही. (हे देखील वाचा: ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच खेळू शकतात हे 3 भारतीय खेळाडू, एकदिवसीय विश्वचषकाचा नव्हते भाग)

संयुक्त अरब अमिराती (UAE) ला मिळू शकते यजमानपद

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतल्यास संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) यजमानपदाची संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. मात्र, याआधी आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अल्टिमेटम दिला आहे. ज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण स्टेडियमची कामे 25 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी लागतील, असे म्हटले आहे. यानंतर आयसीसीचे अधिकारी या स्टेडियमचा आढावा घेतील. मग ते आपल्या अहवालात सांगेल की स्टेडियम स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार आहे की नाही.

या दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना

भारतीय संघ 23 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना यजमान पाकिस्तानशी होणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. मात्र, भारतीय संघाचा संघ 12 जानेवारीपर्यंत सर्वांसमोर येऊ शकतो.