Rishabh Pant, Arshdeep Singh And Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) पुढील महिन्यात खेळवली जाणार आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला चांगली कामगिरी करायची आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3-1 ने गमावल्यानंतर हा संघ सध्या टीकाकारांच्या लक्ष्यावर आहे. अशा स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून संघ ही जुनी निराशा मागे टाकू शकतो. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने एक मजबूत संघ निवडला होता, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काही खेळाडू देखील पाहायला मिळतील जे एकदिवसीय विश्वचषकाचा भाग नव्हते. अशा तीन खेळाडूंवर एक नजर टाकूया.

1. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal)

यशस्वी जैस्वालला अद्याप वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही आहे. जैस्वालने कसोटी आणि टी-20 मध्ये टीम इंडियासाठी खळबळ उडवून दिली आहे. 2024 मध्ये, यशस्वी जैस्वाल ही टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, याशिवाय या जयस्वालने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. ज्यामध्ये शतकाचाही समावेश आहे. आता जैस्वालला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते, त्यानंतर चाहते त्याला वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण करताना पाहू शकतात.

Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

2. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh)

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. अर्शदीप टी-20 वर्ल्ड कपमध्येही खेळताना दिसला होता. मात्र, आतापर्यंत या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियासाठी केवळ 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 12 विकेट आहेत. आता अर्शदीपची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड होऊ शकते.

Arshdeep Singh (Photo Credit - Twitter)
Arshdeep Singh (Photo Credit - Twitter)

हे देखील वाचा: ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तान संघात मोठा बदल, माजी पाकिस्तानी खेळाडूची एन्ट्री

3. ऋषभ पंत (Rishabh Pant)

कार अपघातानंतर, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत जवळपास दीड वर्षे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला, ज्यामुळे तो 2023चा एकदिवसीय विश्वचषकही खेळू शकला नाही. पण पंतने आयपीएल 2024 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर शानदार पुनरागमन केले, त्यानंतर पंत 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही खेळताना दिसला. तेव्हापासून पंत टीम इंडियासाठी सतत क्रिकेट खेळत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही पंतची कामगिरी चांगली होती, आता पंत पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना दिसणार आहे.

Rishabh Pant (Photo Credit - X)