Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान क्रिकेट संघाला अखेर घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात विजयाची चव चाखायला मिळाली. पाकिस्तानने मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 152 धावांनी जिंकला, या विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. इंग्लंड संघाला 297 धावांचे लक्ष्य मिळाले होते, प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात अवघ्या 144 धावांवर गारद झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स सर्वाधिक 37 धावा केल्या. तर, पाकिस्तानकडून नोमान अलीने दुसऱ्या डावात आठ, तर साजिद खानने दोन बळी घेतले.
Pakistan's big selection gamble paid off - their losing streak ends in Multan! https://t.co/3YY8TfnyDm | #PAKvENG pic.twitter.com/MQLDbQzQRs
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 18, 2024
पाकिस्तानची पराभवाची मालिका अखेर संपुष्टात
पाकिस्तान क्रिकेट संघ दीर्घकाळ कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सतत पराभवाचा सामना करत होता. काही काळापूर्वी बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केले होते. (हे देखील वाचा: Pakistan vs England 2nd Test 2024 Day 3 Stumps Scorecard: पाकिस्तान विजयापासून 8 विकेट्स दूर, इंग्लंडला विजयासाठी 261 धावांची गरज, पहा स्कोअरकार्ड)
येथे पाहा पूर्ण स्कोअरकार्ड
पाकिस्तानचा पहिला डाव : पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बाबर आझमच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलामने शतक झळकावले तर सॅम अयुबने 77 धावांची खेळी केली. पाकिस्तानने पहिल्या डावात 366 धावा केल्या होत्या. इंग्लंडतर्फे जॅक लीचने चार, तर ब्रायडन कार्सने तीन बळी घेतले.
इंग्लंडचा पहिला डाव : इंग्लंडने पहिल्या डावात 291 धावा केल्या. बेन डकेटने 114 धावांची खेळी खेळली, पण त्याच्याशिवाय एकही इंग्लिश फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. साजिद खानने पहिल्या डावात सात, तर नोमान अलीने तीन बळी घेतले.
पाकिस्तानचा दुसरा डाव : पाकिस्तानचा दुसरा डाव 221 धावांवर आटोपला. आघा सलमानने सर्वाधिक 63 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून शोएब बशीरने चार तर जॅक लीचने तीन बळी घेतले.