Pakistan National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 1st ODI Match 2025 Scorecard Update: पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेचा (Pakistan ODI Tri-Series, 2025) पहिला सामना आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात लाहोरच्या (Lahore) गद्दाफी स्टेडियमवर (Gaddafi Stadium) खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाने पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला. 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 252 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने शानदार शतक झळकावले. (हे देखील वाचा: ICC Champions Trophy 2025: 'भारताला हरवायचेच आहे...', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे विधान)
Fakhar Zaman laid the platform, but Pakistan found little support around him
A big win for New Zealand in the tri-series opener 💪
Scorecard: https://t.co/io1MQvJUYV | #PAKvNZ pic.twitter.com/zaDLXSyEwJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 8, 2025
ग्लेन फिलिप्सची नाबाद 106 धावांची शानदार खेळी
दरम्यान, तिरंगी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि त्यांना फक्त 39 धावांच्या धावसंख्येवर दोन मोठे अपयश आले. न्यूझीलंड संघाने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 330 धावा केल्या. न्यूझीलंडकडून स्टार अष्टपैलू ग्लेन फिलिप्सने नाबाद 106 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, ग्लेन फिलिप्सने 74 चेंडूत सहा चौकार आणि सात षटकार मारले. ग्लेन फिलिप्स व्यतिरिक्त, डॅरिल मिशेलने 81 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. व्यतिरिक्त अबरार अहमदने दोन विकेट घेतल्या.
पाकिस्तानी फलंदाज ठरले फ्लाॅप
331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. स्टार फलंदाज बाबर आझमचा खराब फॉर्म सुरूच आहे. या सामन्यात तो 10 धावा करून बाद झाला. त्याच्याशिवाय कामरान गुलाम 18, रिझवान 3 आणि सलमान आगा 40 धावा करून बाद झाले. यादरम्यान फखर जमानने 84 धावांची सर्वाधिक खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मायकेल ब्रेसवेल 2 आणि ग्लेन फिलिप्स 1 विकेट मिळाली. आता तिरंगी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 फ्रेबुवारीला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता खेळवण्यात येईल.