PAK vs BAN (Photo Credit - X)

Bangladesh National Cricket Team Beat Pakistan National Cricket Team: बांगलादेशने रावळपिंडीत इतिहास रचला आहे. त्यांनी पाकिस्तानचा त्यांच्याच घरात पराभव केला. बांगलादेशने कसोटी मालिकेतील पहिला सामना 10 गडी राखून जिंकला. पाकिस्तानने पहिला डाव 448 धावांवर घोषित केला. यानंतर संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 565 धावा केल्या. दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता 30 धावा करत सामना जिंकला. बांगलादेशचा संघ पाकिस्तानला त्याच्याच मायदेशात कसोटीत 10 गडी राखून पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे. नझमुल हुसैन शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने रावळपिंडीत चमकदार कामगिरी केली. रहीमने संघासाठी सर्वात महत्त्वाची खेळी खेळली. त्याने 191 धावा केल्या.

पाकिस्तानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

शान मसूदचा डाव लवकर घोषित

पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने पहिल्या डावात डाव घोषित करून सर्वात मोठी चूक केली. कर्णधार शान मसूदने बांगलादेश संघाला हलकेच घेतले आणि पहिला डाव 448 धावांवर घोषित केला. (हे देखील वाचा: PAK vs BAN 1st Test Day 4: मुशफिकर रहीमचा झेल सोडणे बाबर आझमला पडले महागात, कर्णधारने ड्रेसिंग रूममध्ये व्यक्त केला संताप; Watch Video)

मुशफिकर रहीमचे दमदार शतक

बांगलादेशचा पहिला डाव 167.3 षटकात 565 धावांवर संपुष्टात आला. बांगलादेश संघाने 117 धावांची आघाडी घेतली होती. बांगलादेशसाठी यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकर रहीमने सर्वाधिक 191 धावा केल्या आहेत. रावळपिंडी कसोटीच्या चौथ्या दिवशी मुशफिकुर रहीमने पाकिस्तानी गोलंदाजांची कोंडी करत उत्कृष्ट शतक झळकावले. मुशफिकुर रहीमने पाकिस्तानविरुद्ध 200 चेंडूंचा सामना करत कसोटी क्रिकेटमधील त्याचे 11 वे शतक पूर्ण केले. यासह मुशफिकुर रहीम कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा तिसरा बांगलादेशी फलंदाज ठरला आहे.

गोलंदाजांनी केली निराशा

रावळपिंडीत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. बांगलादेशी फलंदाजांना बाद करण्यासाठी कर्णधार शान मसूदने सात गोलंदाजांचा वापर केला, पण गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ ऑलआऊट झाला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बांगलादेश संघाने पहिल्या डावात 565 धावा केल्या होत्या.