ICC T20 World Cup 2020: आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 जिंकण्यासाठी पाकिस्तानचा संघ प्रबळ दावेदार- शोएब मलिक
Shoaib Malik (Photo Credits: IANS)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकावर (ICC T20 World Cup 2020) टांगती तलवार आहे. यामुळे आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धा आणखी काही दिवस पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट संघाकडे आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 जिंकण्याची मोठी संधी आहे, असा विश्वास पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) याने व्यक्त केला आहे. आयसीसी टी-20 विश्वचषका 2020वर विजय मिळवण्यासाठी संघाकडे आक्रमक गोलंदाजी असणे गरजेचे आहे. त्यानुसार, पाकिस्तानच्या संघाकडे आक्रमक गोलंदाजी आहे, ज्यामुळे विश्वचषकात चांगली कामगिरी बजावण्यासाठी उपयोगी ठरेल. तसेच पाकिस्तानच्या फिल्डिंगमध्येही अधिक सुधारणा झाल्याचे त्याने सांगितले आहे.

यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धा पार पडणार आहे. मात्र, कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहता टी-20 विश्वचषक 2020 बाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. परंतु, अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याचदरम्यान, पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे, असे विश्वास शोएब मलिक याने व्यक्त केला आहे. दरम्यान तो म्हणाला की, टी-20 विश्वचषक 2020 स्पर्धेसाठी आक्रमक गोलंदाजी असणे गरजेचे असते. पाकिस्तानच्या संघाकडे आक्रमक गोलंदाजी आहे, ज्यामुळे या विश्वचषकात पाकिस्तान संघाकडे विजय मिळवण्यासाठी मोठी संधी आहे, असे शोएब मलिक म्हणाला आहे. हे देखील वाचा- BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना विषाणू; कुटुंबातील चौघांना Coronavirus ची लागण

इंग्लंड दौऱ्यासाठी 29 खेळांडूमध्ये शोएब मलिक याची निवड झाली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 3 कसोटी सामने आणि 3 टी-20 सामने खेळण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली नाही