पाकिस्तान क्रिकेट टीम ((Photo Credit: Getty)

इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) अखेर त्यांच्या संघाचा मुख्य प्रायोजक शोधण्यात यश मिळाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पेप्सीशी (Pepsi) झालेल्या कराराची मुदत संपल्यानंतर बोर्डकडून नवीन प्रायोजक शोधण्यासाठी बोर्डाला धडपडत असल्याने पीसीबीला लज्जास्पद वेळेचा सामना करावा लागला होता. तथापि, पेप्सी वगळता कोणत्याही ब्रँडने पाकिस्तान संघाचा (Pakistan Team) मुख्य प्रायोजक होण्यात रस दाखविला नाही. सध्या इंग्लंडमध्ये असलेली पाकिस्तानी टीमसमोर मुख्य प्रायोजकाशिवाय ही मालिका खेळण्याची वेळ ओढवली होती. तथापि, पीसीबीने ती परिस्थिती टाळण्यासाठी वेगवान कृती केल्याचे समजते आणि पेप्सीने शेवटच्या करारापेक्षा कमी पैशांची ऑफर दिली गेली असली तरी आणखी एका वर्षासाठी त्यांचा करार नूतनीकरण करण्याचे मान्य केले आहेत. 31 जून 2021 पर्यंत पेप्सी पाकिस्तान संघाचा मुख्य प्रायोजक असेल. (फाईव्ह-स्टार हॉटेल नाही इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर आर्थिक संकटामुळे लॉजवर राहण्याची वेळ, तुम्हीच पाहा View Photos)

पेप्सी दोन दशकांहून अधिक काळ पाकिस्तान संघाचा मुख्य प्रायोजक राहिला आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वाणिज्य संचालक बाबर हमीद यांनी पुन्हा एकदा भागीदारी वाढविल्याबद्दल या ब्रँडचे आभार मानले. “1990 च्या दशकापासून पेप्सी आमचा मोलाचा साथीदार आहे, त्यादरम्यान आम्ही मैदानावरील महान आठवणी सामायिक केल्या आहेत आणि पुढील 12 महिन्यांपर्यंत आम्ही हीच अपेक्षा करतो. भागीदारीचा हा विस्तार फक्त पेप्सीशी असलेला आमचा संबंध आणि समजूतदारपणाच प्रतिबिंबित करत नाही, परंतु पाकिस्तान पुरुषांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला पुरस्कृत करणाऱ्या व्यक्तिरेखा आणि दृश्यमानतेवर ते किती महत्त्व देतात हे देखील सूचित करते," हमीद म्हणाले.

इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी पीसीबीने EasyPaisa या डिजिटल वित्तीय सेवा कंपनीलाही पीसीबीने सहयोगी म्हणून स्वीकारले आहे. इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान टीम 3 टेस्ट आणि 3 टी-20 मालिका खेळणार आहे. त्यासाठी खेळाडू आधीच इंग्लंडला पोहचले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेत असताना खेळाडू प्रायोजक लोगोशिवाय किट्स परिधान केल्याचे दिसून आले होते.