PAK vs WI (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs West Indies Cricket Team 1st Test 2025 Live Streaming:  पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 17 जानेवारीपासून खेळली जाणार आहे. पहिला कसोटी सामना मुलतानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. तथापि, यादरम्यान त्यांनी दोन पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांसाठी पाकिस्तानलाही भेट दिली आहे. पाहुणा संघ 17 जानेवारीपासून मुलतान येथे पहिला कसोटी सामना खेळेल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शान मसूद पाकिस्तानचे नेतृत्व करेल. तर वेस्ट इंडिजची धुरा क्रेग ब्रेथवेटवर असेल.

हे दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 सायकलमध्ये त्यांची शेवटची मालिका खेळतील. तथापि, ही मालिका दोन्ही संघांना त्यांचा खेळ सुधारण्याची संधी देईल कारण दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत.

पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी वेळापत्रक

पहिला कसोटी सामना, शुक्रवार 17 जानेवारी ते मंगळवार 21 जानेवारी, मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान

दुसरा कसोटी सामना, शनिवार 25 जानेवारी ते बुधवार 29 जानेवारी, मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल?

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवार, 17 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता मुलतानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

कुठे पाहणार सामना?

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेच्या दूरदर्शन प्रक्षेपणाबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. परंतु कसोटी सामन्यांचे थेट प्रक्षेपण फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघांचे खेळाडू

पाकिस्तान संघ: शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, काशिफ अली, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), नोमान अली, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), साजिद खान आणि सलमान अली आगा.

वेस्ट इंडिज संघ: क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जोशुआ दा सिल्वा (उपकर्णधार), अ‍ॅलिक अथानाझे, कीसी कार्टी, जस्टिन ग्रीव्हज, कावेम हॉज, टेविन इमलाच, आमिर जांगू (यष्टीरक्षक), मायकेल लुईस, गुडाकेश मोती, अँडरसन फिलिप, केमार रोच, केविन सिंक्लेअर, जेडेन सील्स आणि जोमेल वॉरिकन