PAK vs SL 3rd ODI: पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद ने रचला इतिहास, एमएस धोनी च्यासह 'या' एलिट लिस्टमध्ये झाला समावेश
सरफराज अहमद (Image Source/PTI)

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याने श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या वनडे मॅचमध्ये मैदानात उतरताना ऐतिहासिक कामगिरी बजावली. वनडे सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाचे नेतृत्व करणारा सरफराज पाकिस्तानचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. इतकेच नाही तर भारताचा दिग्गज विकेटकीपर महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) नंतर 50 वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा सरफराज हा जगातील दुसरा विकेटकीपर कर्णधार आहे. मात्र या बाबतीत धोनीपेक्षा सरफराज खूपच मागे आहे. धोनीने 200 वनडे सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी संघाने 110 सामने जिंकले आहेत, तर 74 सामन्यात तो पराभूत झाला आहे. पाच सामने बरोबरीत राहिले, तर 11 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.सरफराजने, पाकिस्तानी संघाचा कर्णधार म्हणून 50 मॅचमध्ये 27 सामने जिंकले आहेत तर 20 सामन्यात संघ पराभूत झाला आहे.

सरफराजच्या नेतृत्वात झालेल्या 50 व्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पावसाचा सामना झाला, तर दुसर्‍या वनडे सामन्यात पाकिस्तानने 67 धावांनी विजय मिळवला. पहिले फलंदाजी करत श्रीलंकाने 5 विकेट गमावत 297 धावा केल्या. श्रीलंकासाठी दनुष्का गुणथिलाका याने मालिकेतील दुसरे शतक केले आणि 113 धावांची खेळी केली. पण, फाखर जमान आणि अबिद अली यांची अर्धशतकी खेळी गुणथिलाकाच्या शतकासमोर वरचढ राहिली आणि पाकिस्तानने 5 विकेटने विजय मिळवत मालिका 2-0 ने जिंकली.

दुसरीकडे, नुकतेच सरफराजचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यादरम्यान सरफराजने असे कार्य केले की त्याची तुलना धोनीशी केली गेली आणि यावर यूजर्सने चांगली फिरकी घेतली. गरम आणि दमट परिस्थितीत फलंदाजी करताना शहान जयसूर्या याचे 34 व्या षटकात स्नायू ताणले गेले आणि तो जमिनीवर पडला. यानंतर सरफराज जयसूर्याकडे आला आणि त्याला मदत करण्यास सुरवात केली. यानंतर, सरफराजची तुलना धोनीशी झाली. 2015 मध्ये मुंबईत झालेल्या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसी याचीही धोनीने त्याच प्रकारे मदत केली होती.