
श्रीलंकेच्या संघाने शेवटच्या क्षणी पाकिस्तानला (Pakistan) जाण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने (Sri Lanka Cricket Board) पाकिस्तान दौरा रद्द केला. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने त्यांना दहशतवादी हल्ल्याचा धोका होण्याच्या कारणाने पाकिस्तानला जाण्यास या नकार दिला. 2009 मध्ये पाकिस्तान संघावर लाहोरमध्ये हल्ला झाला होता. पण, आता श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने सांगितले की, सहा सामन्यांच्या मालिकेदरम्यान खेळाडूंवर दहशतवादी हल्ल्यांचा संशय असल्यावरही संघ पाकिस्तान दौर्यासाठी जातील. श्रीलंका क्रिकेट सेक्रेटरी मोहन डी सिल्वा (Mohan de Silva) यांनी सांगितले की, त्यांना मंगळवारी पाकिस्तानला रवाना होण्यास संरक्षण मंत्रालयाकडून सर्व आदेश मिळाले आहेत. (PAK vs SL: श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्याबद्दल संतापलेल्या शोएब अख्तर याने करून दिली 1996 च्या वर्ल्ड कपची आठवण)
"संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. आम्ही ठरविल्याप्रमाणे हा दौरा होईल. मी स्वत: आणि आमचे पदाधिकारीही संघासमवेत पाकिस्तानला जाणाणार आहोत, "डी सिल्वा यांनी एएफपीला सांगितले. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या स्थितीत मागील आठवड्यात झालेल्या अहवालांना संरक्षण मंत्रालयाकडे तपासासाठी पाठविण्यात आले होते. यजमानांकडून केलेल्या व्यवस्था तपासण्यासाठी डी सिल्वा यांनी सुरक्षा सल्लागारासमवेत गेल्या महिन्यात पाकिस्तानला भेट दिली होती.
पाकिस्तानच्या लाहोर (Lahore) मध्ये एका कसोटी सामन्यादरम्यान मार्च 2009 मध्ये श्रीलंकेचा क्रिकेट संघ दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले होते. हल्ल्यामनात बहुतेक आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने मंडळाला असा इशारा दिला होता की, त्यांना संघातील खेळाडूंवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर बोर्डाने हा दौरा रद्द केला नाही पण, सरकारने सुरक्षेच्या परिस्थितीचा पुन्हा विचार करावा आणि या स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घ्यावा असे सांगितले. श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा 27 सप्टेंबरपासून सुरु होईल. यापूर्वी श्रीलंकेने तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांसाठी संघांची घोषणा केली आहे.