पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने श्रीलंकेच्या (Sri Lanka) 10 खेळाडूंनी आगामी पाकिस्तान दौर्यावरून माघार घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपला संताप व्यक्त करत अख्तर याने बुधवारी दोन ट्विट केले आणि वेळोवेळी श्रीलंकेच्या पाकिस्तानकडून पाठिंबा देणाऱ्या बोर्डची आठवण करून दिली. दरम्यान, अख्तर यांनी यावर्षी एप्रिलमध्ये श्रीलंकेत झालेल्या इस्टर बॉम्बस्फोटांचा उल्लेखही केला आणि त्याचबरोबर 1996 च्या क्रिकेट विश्वकरंडकाची आठवणही दिली जेव्हा दोन देशांतील संघटनांनी सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. (पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस, फवाद हुसेन यांच्या आरोपांवर श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरीन फर्नांडो यांनी दिले स्पष्टीकरण)
अख्तर याने लिहिले की, "श्रीलंकेच्या 10 खेळाडूंनी पाकिस्तान दौर्यातून नाव मागे घेतल्यामुळे मी फार निराश आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच श्रीलंका क्रिकेटला पाठिंबा देणारा आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या इस्टर हल्ल्यानंतरही आम्ही आमचा 19 वर्षाखालील संघ तेथे खेळण्यासाठी पाठवला आणि आम्ही असे प्रथमच आंतरराष्ट्रीय संघ बनलो." पुढे त्याने लिहिले की, "1996 सालचा क्रिकेट विश्वचषक कोणाला विसरू शकेल तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतरही पाकिस्तानने कोलंबोमध्ये भारताबरोबर मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी संयुक्त संघ पाठविला होता. आम्ही देखील श्रीलंकेकडूनही अशीच अपेक्षा करत आहोत. त्यांचा बोर्ड पाठिंबा देत आहे, तसेच खेळाडूंनीही केले पाहिजे."
So disappointed with the 10 Sri Lankan players who have pulled out of Pakistan tour.
Pakistan has always been a huge support for SL cricket.
Recently after deadly Easter Attacks in SL, our under-19 team was sent on tour there, being the first international team to volunteer.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 11, 2019
And ofcourse who can forget the 1996 World Cup when Australia & West Indies refused to tour Sri Lanka.
Pakistan sent a combined team with India to play a friendly match in Colombo.
We expect reciprocation from Sri Lanka. Their board is cooperating, players should also.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 11, 2019
पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया आणि सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या 10 खेळाडूंनी सोमवारी, 9 सप्टेंबर पाकिस्तान दौर्यावरून माघार घेतली. वनडे कर्णधार दिमुथ करुणारत्ने, टी-20 कर्णधार लसिथ मलिंगा, माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, थिसारा परेरा आणि दिनेश चंडिमल यांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. याबाबत बोलताना श्रीलंका बोर्ड म्हणाले की, पाकिस्तानमध्ये खेळण्यास इच्छूक असलेल्या खेळाडूंचा संघ निवूडून बोर्ड पाठवेल. श्रीलंका संघाला पाकिस्तानमध्ये 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.