निरोशन डिकवेला (Photo Credit: Getty Images)

दहा वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेट पाकिस्तान (Pakistan) मध्ये परतले आहे आणि सर्वत्र खळबळ उडाली आहे. पण, खराब प्रकाश आणि पावसामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळत अडथळा निर्माण झाला. मैदानावर खेळ झाला नाही, पण एक पाकिस्तानी पत्रकार सर्व चुकीच्या कारणास्तव चर्चेत आला आहे. श्रीलंका (Sri Lanka) आणि पाकिस्तान यांच्यात रावळपिंडीमध्ये (Rawalpindi) खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी पावसानेच बॅटिंग केली. दुसर्‍या दिवशी केवळ 18.2 षटकांचा खेळ खेळण्यात आला. दिवसानंतरच्या पत्रकार परिषदेत श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) पत्रकारपरिषद उपस्थित राहिला. यामध्ये असे काही घडले ज्यामुळे जगभरातील खेळाडू आणि तिथे उपस्थित सर्वजण हसू लागले. पत्रकार परिषदेत एका पत्रकार असं काही बोलला की सर्वांनाच आश्चर्य वाटले त्यानंतर डिकवेलाने त्याच्या उत्तराने त्याची बोलती बंद केली.

पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकार डिकवेला ओळखू शकला नाही आणि त्याने डिकवेलाला धनंजय डी सिल्वा म्हणून प्रश्न विचारला. पत्रकाराने विचारले, "तुम्ही या खेळीत शतकाचा विचार करत आहात?" यावर डिकवेलाने उत्तर दिले, 'मी डिकवेला आहे, डी सिल्व्हा नाही. मी आधीच 33 धावांवर बाद झाला आहे. कदाचित दुसर्‍या डावात मी शतक करू." डिकवेलाचे हे उत्तर ऐकून पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वजण हसू लागले. याचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंकामधील मॅचबद्दल बोलायचे तर, दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने पहाटे पाच विकेट्स गमावून 220 धावा केल्या आणि 7.5 षटकांच्या गेमनंतर 225 धावांवर असताना पावसाने खेळत व्यत्यय आणला. खेळ दोन तास आणि 43 मिनिटं थांबला आणि जेव्हा पुन्हा सुरू केली त्यानतंर केवळ दहा ओव्हरचाच खेळ झाला. यादरम्यान, श्रीलंकाने डिकवेलाची 33 धावांवर विकेट गमावली. खराब प्रकाशयोजनामुळे दिवसाचा खेळ स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता संपुष्टात आला आणि श्रीलंकाने सहा विकेट्स गमावून 263 धावा केल्या होत्या. धनंजय डी सिल्वा 72 आणि दिलरुवान परेरा दोन धावांवर खेळत होते.