(Image Credit: ICC Video Screenshot)

यजमान इंग्लंड (England) संघाने लागोपाठ दोन सामने जिंकत आयसीसी (ICC) विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. 12 गुणांसह इंग्लंडचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आपल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंड (New Zealand) ला तब्बल 199 धावांनी पराभूत केलं. यामुळे पाकिस्तान (Pakistan) संघाच्या सेमीफायनल प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. आता त्यांचा एक सामना उरला असून यात त्यांना मोठया फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तान सेमीफायनलला पोहचण्याची शक्यता नसल्यानं आता त्यांच्यासमोर जे पर्याय आहेत त्यावरून सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत आहे. (PAK vs BAN: World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान याला 'हे' करावे लागणार आहे, जाणून घ्या काय आहे गणित)

पाकिस्तान-बांगलादेश (Bangladesh) यांच्यात शुक्रवारी लॉर्ड्स (Lords) च्या मैदानावर सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचे विश्वचषकमधून बाहेर पडणे जवळ जवळ निश्चित आहे. मात्र, सामन्याआधी पत्रकारांशी बोलताना पाकचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) म्हणाला, "हे असे आहे की आपण 400, 500, 600 धावा केल्या आणि त्यानंतर विरोधी संघाला 50 धावांवर बाद केले तर आपण 316 धावांच्या फरकाने आवश्यक जिंकू शकता." सरफराजच्या या वाटल्यावर नेटकरी आपले हसू आवृ शकले नाही आणि पाकिस्तानी कर्णधारवावर पुन्हा निशाणा सांध्यात त्याला ट्रोल केले.

100 धावा अजून का नाहीत?

उच्च कोटींचा आत्मविश्वास

चमत्कारी भाग्य?

बांग्लादेशविरुद्ध सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक हरली आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडेल. कारण त्यांना बांगलादेशने एक धाव जरी काढली तरी पाक स्पर्धेतून बाहेर पडेल. गुणतक्त्यात पाचव्या स्थानी असलेल्या पाकिस्तानला शेवटच्या सामन्यात विजयासह 11 गुण मिळवता येतील.