PAK vs AUS, T20 World Cup 2021: आकाश चोप्राने सांगितले कोण जिंकणार पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सेमीफायनलची लढत
आकाश चोपडा (Photo Credit: Instagram)

आयसीसी विश्वचषकच्या (ODI आणि टी-20) बाद फेरीत पाकिस्तान (Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया  (Australia) चार वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने चारही सामने जिंकले आहेत. 2015 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला होता. आज दुबई (Dubai) इंटरनॅशनल स्टेडियमवर आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) या सामन्याबाबत आपले भाकीत वर्तवले आहे. या सामन्यात पाकिस्तानला साथ देत त्याने इतिहासाची पुनरावृत्ती होण्याऐवजी पुन्हा एकदा लिहिली जाईल असे म्हटले आहे. न्यूझीलंड आधीच टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहे आणि आता त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या अंतिम सामन्यासाठी वाट पाहत आहेत. (ENG vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडने हिशोब चुकता केला, नाट्यमय सामन्यात इंग्लंडचा पराभव करून मिळवले सलग तिसऱ्या फायनलचे तिकीट)

चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, पाकिस्तान इतिहासाची पुनरावृत्ती करणार नाही तर स्वतःचा एक नवीन इतिहास घडवतील. “पाकिस्तान जिंकेल. इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, पण नवा इतिहास पुन्हा लिहिला जाईल.” आकाशने असेही स्पष्ट केले की मिचेल स्टार्क आणि शाहीन आफ्रिदी आजच्या सामन्यात नक्कीच सर्वोत्तम गोलंदाज असतील आणि त्यांना फिरकीपटू अॅडम झाम्पा आणि शादाब खान साथ देतील. पाकिस्तान हा एक आशियाई राष्ट्र आहे आणि ते लेगस्पिन खेळायला हवे तसे खेळत नाहीत. चोप्रा म्हणाले, “पॉवरप्लेमध्ये दोन किंवा अधिक विकेट पडतील. दोन्ही संघ नवीन चेंडूने आक्रमण करतील. दुसरे, मला विश्वास आहे की डावखुरा वेगवान गोलंदाज - मिचेल स्टार्क आणि शाहीन शाह आफ्रिदी - सामन्याच्या विविध टप्प्यांवर एकत्र तीन किंवा अधिक विकेट घेतील. लेग-स्पिनर [अॅडम] झाम्पा आणि शादाब [खान] एकत्र आणखी दोन विकेट घेतील. पाकिस्तान, एका आशियाई राष्ट्रासाठी, लेग-स्पिन खेळायला पाहिजे तसे खेळत नाही,” माजी क्रिकेटपटूने भाकीत वर्तवले.

आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने या सामन्याबाबत आपले भाकीत वर्तवले आहे. या सामन्यात पाकिस्तानला साथ देत त्याने इतिहासाची पुनरावृत्ती होण्याऐवजी पुन्हा एकदा लिहिली जाईल असे म्हटले आहे.

यंदा स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यात पाकिस्तानने एकही सामना गमावला नाही आणि पाचही सामने जिंकले. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघाने ग्रुप स्टेजमधील पाचपैकी चार सामने जिंकले. बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांचा पराभव करून त्यांच्या गटात अव्वल स्थान पटकावले. तर आरोन फिंचच्या कांगारू संघाने वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर त्यांना गट 1 मध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला.