सचिन तेंडुलकरचे पहिले वनडे शतक (Photo Credit: Twitter/ICC)

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत धावांचा डोंगर उभारला आहे, जे पाहून आजही अनेक जण चकित होतात. त्याचप्रमाणे 'क्रिकेटचा देव' सचिनच्या नववा 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम आहे जो मोडणे अशक्य असल्याचे सिद्ध होईल. पण आपल्या कारकिर्दीदरम्यान, कसोटी सामन्यात फक्त एका वर्षात शतक झळकावणाऱ्या सचिनला वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या शतकाची 1-2 नाही तर तब्बल पाच वर्षाचा कालावधी लागला होता. इतकेच नाही तर सचिनला यासाठी पूर्ण 78 सामने प्रतीक्षा करावी लागली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सचिनचे पहिला वनडे आंतरराष्ट्रीय शतक रेकॉर्ड (Sachin 1st ODI Hundred) बुकमध्ये 9 सप्टेंबर 1994 मध्ये नोंदवले गेले. होय, आज 26 वर्षांपूर्वी सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) कोलंबोमध्ये (Colombo) झालेल्या सामन्यात 49 वनडे शतकांपैकी पहिले शतक झळकावले होते. सचिनचा तो 78 वा वनडे सामना होता. सचिनने 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. (सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी अखेर सापडले! मास्टर ब्लास्टरने पारंपरीक पोषाखातील 1993 मधील टीमचा फोटो शेअर करत WV Raman ला दिले उत्तर)

सचिनने यापूर्वी 17 अर्धशतकं केली पण त्याचे शतकात रूपांतर करणार त्याला जमले नाही. पण, अखेर श्रीलंकेतील सिंगर वर्ल्ड सिरीज दरम्यान सचिनला ब्रेकथ्रू मिळाला.  त्याची आवडती विरोधी टीम, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने आपले पहिले वनडे शतक झळकावले. तेंडुलकरने 130 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने110 धावांचा डाव खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात सचिनच्या खेळीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारताने 31 धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियन नियमित अंतरानंतर फलंदाजांना बाद करत असताना तेंडुलकरने संपूर्ण डावात क्रिकेटचा आपला आक्रमक खेळ केला. भारताने 215 धावांवर ऑस्ट्रेलियाला डाव गुंडाळला.

पाहा सचिनचा पहिल्या वनडे शतकाचा तो डाव

मनोज प्रभाकर समवेत सचिनने डावाची सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांवर ज्यामध्ये क्रेग मॅकडर्मोट, ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्न यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश होता,  वर्चस्व गाजवले.अखेर सचिनने वनडे सामन्यात 48 शतकं केली आणि कारकिर्दीच्या शेवटी इतिहासातील सर्वोच्च शतकी खेळी करणारा म्हणून विक्रम नोंदवला. एकूणच सचिनने 100 आंतरराष्ट्रीय शतकं (कसोटीत 51, वनडे 48) केली आहेत, जो की एक विश्वविक्रमही आहे. 'मास्टर ब्लास्टर'ने 463 वनडे सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या.