मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara), या दोंघांची क्रिकेट विश्वातील दोन महान फलंदाजांमध्ये गणना केली जाते. असा कोणताही रेकॉर्ड नाही जो सचिन आणि लाराच्या नावावर नसेल. तेंडुलकरच्या खात्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या अनेक विक्रमांची नोंद आहे. कसोटी आणि वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीतील आजचा दिवस, 17 ऑक्टोबर 2008, हा खास दिवस होता. त्याच दिवशी सचिनने लाराला पिछाडीवर करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. सचिनने आजच्या दिवशी ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध चंदिगढ टेस्ट कारकिर्दीतील 152 वा सामना खेळलं. यात सचिनने 88 धावांची शानदार खेळी केली आणि 12,000 टेस्ट धावांचा टप्पा गाठला. असं करत सचिनने लाराच्या 11,953 धावांचा रेकॉर्ड मोडला. (महाराष्ट्राची शान सचिन तेंडूलकरच्या मुलीला धड मराठीही बोलता येत नाही; सोशल मिडीयावर झाली ट्रोल Video)
मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यात सचिनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजला येत पहिल्या दिवशी टी ब्रेकनंतर पीटर सिडल याच्या गोलंदाजीवर तीन धावा घेऊन लाराला मागे टाकले. यांच्यानंतर आता सचिनने टेस्टमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. बीसीसीआयने 17 ऑक्टोबर 2008 च्या या सामन्याची खास क्लिप ट्विटरवरून शेअर केली आहे. तेंडुलकरने लाराचा विक्रम मोडताच मोहाली स्टेडियमवर फटाके फोडले गेले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनीही त्यांचे कौतुक केले. भारताने ही मॅच 320 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली.
This Day in 2008 - @sachin_rt surpassed Brian Lara to become the highest run-scorer in Tests 🙌🙌 pic.twitter.com/XoRTNF2zAs
— BCCI (@BCCI) October 17, 2019
सचिनने आपल्या कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला होता. सचिनने 200 मॅचमधील 329 डावात 53.78 च्या सरासरीने 15, 921 धावा केल्या आहेत. यात त्याने 51 शतकं 68 अर्धशतकं केली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार 13, 378 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.