महाराष्ट्राची शान सचिन तेंडूलकरच्या मुलीला धड मराठीही बोलता येत नाही; सोशल मिडीयावर झाली ट्रोल (Video)
सारा तेंडूलकर (संग्रहित संपादित प्रतिमा)

क्रिकेटर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याच्याकडे महाराष्ट्रासह भारताची शान म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्रासाठी तर हा मराठी माणूस फार मोठा अभिमान आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या बांद्रा पश्चिम सारख्या मराठी परिसरात तो राहत आहे. सोशल मिडीयावर सचिनची मुलगी सारा तेंडूलकरचा (Sara Tendulkar) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साराने जे वाक्य उच्चारले आहे त्यामुळे सध्या ती प्रचंड ट्रोल होत आहे. माध्यमांशी बोलताना साराने ‘मी मराठीमध्ये बोलू शकत नाही’ अशी कबुली दिली आहे. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

एनजीओ अपनालय (Apnalaya) साठी निधी उभारण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या मॅरेथॉनमध्ये सचिनची मुलगी सारा तेंडूलकरही सहभागी झाली होती. साराने यावेळी आपल्या मेहनतीने यंग फंडरेजर (Young Fundraiser) असा किताबही मिळवला. त्यानंतर माध्यमांनी मुलाखतीसाठी तिला गराडा घातला. त्यावेळी ती मराठी असल्याने एका मराठी माध्यमाच्या प्रतिनिधीने तिला या यशाबद्दल कसे वाटते असे विचारले. त्यावर उत्तर देताना साराने चक्क ‘I can't speak in marathi properly’, म्हणजेच ‘मी मराठीत नीट बोलू शकत नाही’ असे उत्तर दिले.

साराचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एका मराठी व्यक्तीची मुलगी आपल्या मातृभाषेत धड चार शब्द नीट बोलू शकत नाही हे पाहून, अनेक मराठी लोकांनी कमेंटद्वारे आपला रोष दर्शवला आहे. एकीकडे मराठी भाषा लोप पावली जात आहे त्यावर उपाययोजना करण्यासाठी लोक धडपडत आहेत. तर दुसरीकडे सचिन आणि अंजली तेंडूलकर सारखे पालक आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेचे प्राथमिक धडेही देत नाहीत, हे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.