
Vinesh Phogat Cousin Navdeep Death: कुस्तीपटू आणि राज्य पदक विजेता नवदीप (Navdeep Phogat), ऑलिम्पियन आणि काँग्रेस आमदार विनेश फोगट (Vinesh Phogat) यांचा चुलत भाऊ हरियाणातील चरखी दादरी येथे रस्ता अपघातात मरण पावला. शुक्रवारी (4 एप्रिल) घासोला गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग-148 बी वर त्यांची कार एका अज्ञात वाहनाला धडकली. नवदीप चा मृतदेह शवविच्छेदनासाठी दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता. आता तो त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुस्तीगीर नवदीप त्याच्या मित्रांसह चरखी दादरी येथे आला होता. परत येत असताना, तो राष्ट्रीय महामार्ग 148-ब वरील घासौला गावाजवळ रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
Charkhi Dadri, Haryana: Wrestler and state medalist Navdeep, cousin of Olympian and Congress MLA Vinesh Phogat, died in a road accident on NH-148B near Ghasola village on Friday night after being hit by an unidentified vehicle. His body was sent for post-mortem at Dadri Civil… pic.twitter.com/kpQrtiKmEp
— IANS (@ians_india) April 5, 2025
एक महिन्याची मुलगी
नवदीप स्वतः एक कुस्तीगीर होता आणि त्याने राज्यस्तरीय अनेक पदके जिंकली होती. याशिवाय तो इतर कुस्तीगीरांना सराव करण्यास लावत असे. नवदीपला एक महिन्याची मुलगी आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. बलाली गावात शोककळा पसरली आहे.