Metro Flyover Beam Falls on Car in Mira Road (फोटो सौजन्य - You Tube)

Metro Flyover Beam Falls on Car in Mira Road: मीरा रोड (Mira Road) परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो फ्लायओव्हर (Metro Flyover) वरून एक मोठा काँक्रीट बीम (Concrete Beam) खाली पडला आणि चालत्या कारमध्ये घुसला. ज्यामुळे कारची पुढची काच फुटली. सुदैवाने या अपघातात कार चालकाचा जीव वाचला. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, एक पोलिस कर्मचारी आणि काही लोक खराब झालेल्या कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे. समोरून गाडीच्या विंडस्क्रीनमधून एक जड काँक्रीट बीम आत शिरल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये, उड्डाणपुलाचा एक भाग तुटलेला दिसत आहे. तथापि, तो भाग खाली पडला की नाही हे स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा उड्डाणपूल मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. तथापि, आतापर्यंत या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही किंवा कोणत्याही सरकारी संस्थेने कोणतेही विधान जारी केलेले नाही. (हेही वाचा - Student Dies While Speaking on Stage: निरोप समारंभात भाषण करताना बीएससीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; परंडा शहरातील रा गे शिंदे महाविद्यालयातील घटना)

पहा व्हिडिओ - 

हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिले, 'हे थेट 'फायनल डेस्टिनेशन' चित्रपटातील दृश्य असल्यासारख वाटत आहे. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, 'जर हे अमेरिका असते तर ड्रायव्हरला कोट्यवधींची भरपाई मिळाली असती, पण इथे त्याला स्वतः खर्च करावा लागेल.'