Crude Oil (Photo Credits: PTI)

आज केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरीलत (Excise Duty) प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. पण किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही कारण आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती घसरल्यामुळे आवश्यक असलेल्या किमतीत कपात करून ही वाढ बॅलन्स केली जाईल असं Oil Ministry कडून  सांगण्यात आले आहे.

करांमध्ये होणारा कोणताही बदल सामान्यतः ग्राहकांना फटका समजला जातो. परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री किमतीत कोणताही बदल होणार नाही कारण उत्पादन शुल्क वाढ ही आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीमुळे किरकोळ किमतींमध्ये झालेल्या कपातीविरुद्ध असणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापारी तणावामुळे मंदीची भीती निर्माण झाली आहे ज्यामुळे तेलाची मागणी कमी होऊ शकते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती एप्रिल 2021 नंतरच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. भारत आपल्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 85% तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ.  

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात झालेल्या वाढीवर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली असूनही सरकार परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप केला आहे.

आज  मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 103.50 रूपये आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 90.03 रूपये आहे.