Photo Credit- X

मुंबई मध्ये बीएमसी च्या H East विभागामध्ये वांद्रे केबिन भागात 600 इंच व्यास असलेल्या तुलसी जलवाहिनीच्या कामासाठी 8 एप्रिल दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल भागात मंगळवार, 8 एप्रिल दिवशी संध्याकाळी 5 ते 7.30 या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर H East विभागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.

H East विभागामधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा खंडित असेल तेव्हा काटकसरीने पाण्याचा वापर करावा. तसेच पुढील 4-5 दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन बीएमसी कडून करण्यात आले आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, या अपग्रेडमुळे भविष्यात एच-ईस्ट वॉर्डमधील पाण्याचे एकूण वितरण आणि दाब सुधारण्यास मदत होईल. दीर्घकालीन पायाभूत सुविधांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी नियोजित देखभालीच्या महत्त्वावर जोर देऊन, नागरी अधिकाऱ्यांनी प्रक्रियेदरम्यान जनतेला सहकार्य आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.