
चैत्र नवरात्रीनंतर येणार्या एकादशीला तिथीला कामदा एकादशी (Kamada Ekadashi) साजरी केली जाते. यंदा कामदा एकादशी 8 एप्रिल दिवशी साजरी केली जाणार आहे. कामदा एकादशीचं औचित्य साधत हिंदू बांधव भगवान विष्णूची आराधना करतात. कामदा एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. यासोबतच हे व्रत केल्याने जाणून-बुजून केलेली सर्व पापे नष्ट होतात. तसेच इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे आजच्या कामदा एकादशी निमित्त तुमच्या नातेवाईकांना, प्रियजणांना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, WhatsApp Status, Facebook Messages शेअर या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
कामदा एकादशी निमित्त अनेक भाविक दिवसभराचे व्रत करतात. द्वादशी दिवशी हे व्रत पूर्ण केले जाते. एकादशी ला हलका आहार करून उपवास करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात एकदाशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत विठ्ठलाची देखील पूजा केली जाते. वारकरी संप्रदायातील लोक एकादशी व्रत मनोभावे करतात. Kamada Ekadashi 2025 Date: कामदा एकादशी कधी आहे? पारायणाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या.





उदय तिथी नुसार कामदा एकादशी 8 एप्रिल दिवशी साजरी केली जाणार आहे. 8 एप्रिलला रात्री 9 वाजून 12 मिनिटांपर्यंत कामदा एकादशीची तिथी आहे. हिंदू धर्मात एकादशी तिथी अत्यंत पवित्र मानली जाते. एका वर्षात 24 एकादशी आहेत. एकादशीच्या दिवशी जगाचे पालनपोषण करणारे भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा व उपवास केला जातो. कामदा एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूची आराधना केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.