शैनन गेब्रियल (Photo Credit: Instagram)

NZ vs WI 2nd Test 2020: न्यूझीलंड (New Zealand) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विंडीज गोलंदाज शैनन गेब्रियलने (Shannon Gabriell) जबरदस्त कामगिरी करत तीन गडी बाद केले तर 18 षटकांत केवळ 57 धावा केल्या. डॅरेन ब्रावोने (Darren Bravo) शतकवीर हेन्री निकोलसला (Henri Nicholls) सोप्पा झेल सोडल्यावर गेब्रियलला चौथी विकेट मिळाली नाही ज्याची निराशा गोलंदाजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आली. निकोलसने भाग्य त्यादिवशी त्याच्यासोबत याचे कारण म्हणजे विंडीज फिल्डर्सने त्याचे तीन झेल सोडले. निकोलसने याचा फायदा घेत दमदार शतक ठोकले आणि न्यूझीलंडची विंडीजविरुद्ध आघाडी वाढवली. उल्लेखनीय म्हणजे, गेब्रियल त्याच्या संघाच्या गचाळ फिल्डिंगमुळे चिडला होता आणि त्याने आपल्या सहकाऱ्यास शिवीगाळ केली. ब्रावोने निकोलसचा झेल सोडल्यावर संतप्त गेब्रियलच्या जिभेवरील संतुलन सुटलं आणि आपत्तीजनक शब्द वापरला, ज्याचा आवाज स्टम्प माइकमध्ये कैद झाला. (NZ vs PAK T20I Squad: पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर; केन विल्यम्सनचे कमबॅक, तर रॉस टेलरला वगळले)

लक्षात घेण्यासारखे म्हणजे गेब्रियलचा हा 50वा कसोटी सामना आहे. दरम्यान, दुसर्‍या दिवशी न्यूझीलंड 460 धावांवर ऑलआऊट झाले आणि निकोलसने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 174 धावा, तर नील वॅगनरने अर्धशतक झळकावताना नाबाद 66 धावा फटकावल्या. शनिवारी बेसिन रिझर्व्ह येथे दुसर्‍या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काईल जेमीसन आणि टीम साऊदी यांच्यापुढे वेस्ट इंडिज फलंदाजांनी गुडघे टेकले. जेमीसनने पाच तर साऊदीला 3 विकेट मिळाल्या. जेमीसनने दुसऱ्यांदा कसोटी सामन्यात पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाखेर, वेस्ट इंडिजने 8 विकेट गमावून 124 धावा केल्या आहेत. आणि न्यूझीलंडच्या 460 धावांच्या अद्याप 336 धावांनी पिछाडीवर असून त्यांच्यावर आणखी एक मोठ्या पराभवाची टांगती तलवार आहे.

न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात विंडीजवर वर्चस्व गाजवत मालिकेत 1-0 ने विजयी आघाडी घेतली आणि आता ते दुसऱ्या सामन्यातही विजयाच्या जवळ पोहचले आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलवर एक पाऊल पुढे टाकण्यासाठी ते क्लीन स्वीपच्या शोधात आहेत. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या बाळाच्या जन्मानिमित्त पितृत्व रजा घेतली ज्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले आहे.