NZ vs WI 2nd T20I: Glenn Phillips ने न्यूझीलंडसाठी मारले सर्वात जलद टी-20 शतक, वेस्ट इंडिजविरुद्ध Kiwi संघाने केली धावांची बरसात
ग्लेन फिलिप्स (Photo Credit: Twitter/ICC)

NZ vs WI 2nd T20I: Mount Maunganuiच्या बे ओव्हल मैदानात न्यूझीलंड (New Zealand) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिज कर्णधार किरोन पोलार्डने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण एका किवी फलंदाजाने तो चुकीचा सिद्ध केला. यजमान न्यूझीलंडच्या मधल्या फळीतील ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) 46 चेंडूत संघासाठी सर्वात जलद टी-20 शतक ठोकले आणि संघाला 238/3 धावांची विशाल धावसंख्या गाठून दिली. ब्रँडन मॅक्युलम, मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुनरो (Colin Munro) यांच्यानंतर फिलिप्स न्यूझीलंडसाठी क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये शतक करणारा चौथा फलंदाज ठरला पण 46 चेंडूत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा तो न्यूझीलंडचा सर्वात वेगवान फलंदाज ठरला. फिलिप्स फलंदाजीस आला तेव्हा न्यूझीलंडने आधीच सात ओव्हरमध्ये 57/2 पर्यंत मजल मारली होती परंतु खेळपट्टी खूपच हळू होती आणि फलंदाजी करणे कठीण होते. (Lanka Premier League 2020: आंद्रे रसेलची तुफान खेळी, लंकन प्रीमियर लीग सामन्यात ठोकले तिसरे वेगवान टी-20 अर्धशतक)

फिलिप्सला डेव्हन कॉनवेने चांगली साथ दिली. कॉनवेने 21 चेंडूत किमो पॉलच्या ओव्हरमध्ये दोन चौकार आणि दोन षटकारासह अर्धशतक ठोकले. पॉलने 4 ओव्हरमध्ये 64 धावा दिल्या आणि वेस्ट इंडीजचा सर्वात महागड्या आकडेवारीची नोंद केली. फिलिप्सने केवळ 45 चेंडूत शतक झळकावत कॉलिन मुनरोच्या वेस्ट इंडिजविरुद्ध 46 चेंडूत शतकाचा विक्रम मोडीस काढला. पण शेवटच्या षटकात, त्याला गुडघ्याच्या दुखापतीची पुनरावृत्ती झाली जी त्याला ऑकलंड सामन्यादरम्यान झाली होती. पोलार्डने त्याला 51 चेंडूत 108 धावांवर माघारी धाडलं. फिलिप्स आणि कॉनवेच्या तुफान फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने आंतरराष्ट्रीय टी-20 मधील त्यांची तिसरी सार्वधिक 238 सही धावसंख्या गाठली. फिलिप्सच्या खेळीत 10 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता आणि कॉनवेसह त्याने 184 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, ऑकलंडमध्ये पावसाने बाधित झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने D/L नियमाने विजय मिळवला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आजचा सामना जिंकल्यास किवी संघ मालिका जिंकेल तर वेस्ट इंडिजसाठी मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी सामना जिंकणे गरजेचे आहे.