पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Photo Credit: Twitter/ICC)

NZ vs PAK T20I 2020: न्यूझीलंड दौऱ्यावर पाकिस्तानी संघाला (Pakistan Tour of New Zealand) कोरोनानंतर आणखी एक झटका बसला आहे. 18 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) दुखापत झाल्याने बाहेर केले आहेत. आझमच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने संपूर्ण टी-20 मालिकेला मुकावे लागत आहे. टी-20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबरला फेकण्याच्या सत्रात दुखापत झाली. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले जिथे फ्रॅक्चर झाल्याची पुष्टी करण्यात आली. टी-20 मालिका 18 डिसेंबरपासून ऑकलंडमध्ये होणार असून 22 डिसेंबरपर्यंत खेळली जाईल, पण सुमारे दोन आठवडे बाहेर राहावे अपेक्षित असल्याने बाबर यापैकी कोणत्याही सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. अशा स्थितीत उपकर्णधार शादाब खान (Shadab Khan) संघाचे नेतृत्व करेल. तथापि, स्वत: शादाबच्या मांडीच्या सांध्याचे निरीक्षण केले जात आहे, त्यामुळे ऑकलंडमधील (Auckland) पहिल्या सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत सामनाच्या वेळी मूल्यांकन केले जाईल. (NZ vs PAK T20I Squad: पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर; केन विल्यम्सनचे कमबॅक, तर रॉस टेलरला वगळले)

शादाबला दुखापतीमुळे झिम्बाब्वेविरुद्ध घरच्या मालिकेला मुकावे लागले होते. दरम्यान, Mount Maunganui च्या बे ओव्हल येथे बॉक्सिंग डेपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेसाठी बाबर तंदुरुस्त असेल अशी अपेक्षा केली जात आहे. बाबरच्या दुखापतीमुळे दुसऱ्या खेळाडूसाठी संघाचे द्वार उघडेल अशी अपेक्षापाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक यांना आहे. “दुखापती हा व्यावसायिक खेळाचा भाग आहे आणि टी-20 साठी बाबर आझमच्या कॅलिबरचा एखादा खेळाडू गमावणे खूप निराशाजनक आहे, परंतु यामुळे इतर अत्यंत हुशार व उत्साहवर्धक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळेल, त्यांची जबाबदारी समजून घेणे आणि पाकिस्तान संघ एक संपूर्ण पॅकेज असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा," ते म्हणाले.

शादाबच्या दुखापतीबाबत संघाचे प्रशिक्षक म्हणाले, “वैद्यकीय पथक शादाब खानच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे आणि आम्ही आशावादी आहोत की तो टी-20 संघासाठी उपलब्ध होईल, परंतु त्याच्या पूर्ण तंदुरुस्तीसाठी अजून काही दिवस लागतील असे आम्हाला वाटत असल्यास आम्ही त्याला किंवा संघाच्या शक्यतांचा धोका पत्करणार नाही."