
NZ vs PAK 2nd T20I Live Streaming: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) दुसर्या टी-20 सामन्यात रविवारी यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघ विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील मालिकेचा निर्णायक सामना हॅमिल्टन (Hamilton) येथे खेळला जाईल. दुसरा टी-20 सामना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता सुरू होईल. दुर्दैवाने, भारतीय चाहत्यांना या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर पाहता येणार नाही. पाकिस्तानमध्ये PTV Sports टीव्ही चॅनेलवर विनामूल्य टेलिकास्ट पाहता येईल. शिवाय, भारतीय चाहत्यांना चाहत्यांना फॅनकोड मोबाइल अॅपवर विनामूल्य लाइव्ह स्कोअर अपडेट मिळू शकते. तथापि, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामना लाईव्ह ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी यूजर्सना नाममात्र शुल्क भरावे लागेल. यूजर्सना मॅच पाससाठी 19 रुपये किंवा पाकिस्तान-न्यूझीलंड सीरीज 2020 पाससाठी 49 रुपये द्यावे लागतील.
नियमित किवी कर्णधार केन विल्यमसन संघात परतल्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल अपेक्षित आहेत तर पाकिस्तानला त्यांच्या संघात काही बदल करण्याची गरज नसेल कारण त्यांच्यासाठी हा सामना करो किंवा मरो असेल. पहिल्या टी-20 मध्ये वहाब रियाज खूपच महागडा सिद्ध झाला होता आणि त्याच्या जागी युवा मोहम्मद हसननला संधी मिळू शकते. दुसरीकडे, मिचेल सॅटनरच्या नेतृत्वात पहिला टी-20 खेळणारा न्यूझीलंड दुसर्या सामन्यात आणखी मजबूत असेल. नियमित कर्णधार विल्यमसन तसेच टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट या अनुभवी खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे.
पाहा न्यूझीलंड-पाकिस्तान संघ
न्यूझीलंड संघ: मार्टिन गप्टिल, टिम सेफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, डेव्हन कॉनवे, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिशेल सॅटनर (कॅप्टन), डग ब्रेसवेल, स्कॉट कुगेलेइझन, जेकब डफी, ईश सोधी, टॉड एस्टल आणि ब्लेयर टिकर.
पाकिस्तान संघ: मोहम्मद हाफिज, हैदर अली, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), शादाब खान (कॅप्टन), इमाद वसीम, फहीम अशरफ, वहाब रियाज, शाहीन आफ्रिदी, हरीस रऊफ, अब्दुल्ला शफीक, हुसेन तलत, मोहम्मद हसनैन आणि सरफराज अहमद.