आयसीसी वर्ल्ड कप फाइनल 2019 मध्ये इंग्लंड (ENG) ने न्यूजीलैंड (NZ) संघाला पराभूत करुन क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपद संपादन केले. परंतू, या विश्वविजयावर माजी पंच साइमन टॉफेल (Umpire Simon Taufel) यांनी काहीशी शंका उपस्थित केली आहे. ही शंका उपस्थित करत टॉफेल यांनी म्हटले आहे की, सामन्यात दुसऱ्या डावाच्या शेवटच्या षटकात ओव्हरथ्रोच्या माध्यमातून इंग्लंडला 6 धावा मिळाल्या होत्या. परंतू, तो ओव्हरथ्रोच चुकीचा होता. आईसीसी (ICC) च्या नियमानुसार इंग्लंडला 6 धावा नव्हे तर, या ओव्हरथ्रोनुसार पाचच धावा मिळणे आवश्यक होते. कारण ओव्हरथ्रोदरम्यान, दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस करु शकले नव्हते.
अंतिम सामन्यात न्यूजीलैंड (New Zealand) ने पहिल्यांदा फलंदाजी करत 241 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 243 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाटलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली टीम इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या शटकात 15 धावा आवश्यक होत्या. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फलंदाज याने बेन स्टोक्स (Ben Stokes) ने ऑन साइड फटका मारत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, क्षेत्ररक्षण करत असलेल्या मार्टिन गुप्टिल (Martin Guptill) ने स्टंप्सच्या दिशेने चेंडू फेकला. चेंडू स्टोक याच्या बॅटला लागून बाऊंड्रला गेली. या परिस्थिती पंचांनी चेंडू बाऊंड्रीच्या बाहेर गेलेल्या चार धावा आणि फलंदाजांनी धावत काढलेल्या 2 धावा एकत्र जोडून इंग्लंडला 6 धावा दिल्या.
माजी पंच टॉफेल (Simon Taufel) यांच्या मतानुसार, पंचाकडून हा निर्णय चुकीचा गेला. ज्याचा फायदा इंग्लंडला झाला. कारण या निर्णयामुळे इंग्लंडला केवळ एक धाव अधिक गेली नाही. तर, इंग्लंडचा फलंदाज स्टोक्स (Ben Stokes) हासुद्धा स्ट्राईकला परत आला. जर त्या वेळी इंग्लंडला 6 ऐवजी 5 धावाच दिल्या असत्या तर इंग्लंडला शेवटच्या दोन चेंडूंत चार धावांची गरज पडली असती. (हेही वाचा, ENG vs NZ ICC CWC 2019 Final: विश्वचषक फायनलची सुपर ओव्हरही टाय तरी इंग्लंड बनला जगज्जेता, पहा हे नियम)
या वेळच्या आयसीसी वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup) अंतिम सुपर ओव्हर खेळण्यात आली. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळण्यात आली. विशेष म्हणजे सुपर ओव्हरही टाय झाली. सुपरओव्हमध्ये इंग्लंडने आणि न्यूजीलैंड अशा दोन्ही संघांनी 15-15 धावा केल्या. परंतू, जिंकण्यासाठी एक एक धाव काढण्यास असमर्थ ठरले. अखेर आईसीसी (ICC) नियमानूसार अधिक चौकार ठोकणाऱ्या इंग्लंड संघाला विश्वविजेत घोषीत करण्यात आले. संपूर्ण सामन्यात इंग्लंडने 26 तर, न्यूजीलैंड 17 चौकार ठोकल्या.