NZ vs BAN 2nd ODI 2021: थर्ड अंपायरने पलटला ‘सॉफ्ट सिग्नल’चा निर्णय, Kyle Jamieson याच्या 'ड्रॉप कॅच'ने झाला वाद (Watch Video)
काईल जेमीसनचा ड्रॉप कॅच (Photo Credit: Twitter)

NZ vs BAN 2nd ODI 2021: मैदानावरील अंपायरचा सॉफ्ट-सिग्नल मागील काही काळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात डेविड मालनने घेतलेला सूर्यकुमार यादवचा झेल वैध मानला गेला, तर न्यूझीलंड (New Zealand) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यातील दुसर्‍या वनडे सामन्यात किवी गोलंदाज काइल जेमीसन (Kyle Jamieson) विरोधात निर्णय गेला. मंगळवारी जेमीसन बांग्लादेशी फलंदाज तमीम इक्बालला (Tamil Iqbal) गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. उंच किवी वेगवान गोलंदाजाने त्याच्या गोलंदाजीवर पुढे उडी मारून चेंडू जमिनीपासून काही इंच वर असताना पकडला. मैदानावरील अंपायरनी आउट असा ‘सॉफ्ट सिग्नल’ दिला. पण थर्ड अंपायर, वेन नाईट्स यांनी मैदानावरील पंचांच्या ‘सॉफ्ट सिग्नल’कडे दुर्लक्ष करत फलंदाजाला ‘नॉट आउट’ दिलं. (IND vs ENG 4th T20I 2021: Suryakumar Yadav आऊट की नॉट आऊट? फलंदाजाच्या वादग्रस्त विकेटवर विराटसह Netizensने दिली अशी रिअक्शन)

थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवण्यात आल्यावर विविध अँगल्समधून ‘रिप्ले’ बघितल्यानंतर थर्ड अंपायरने तमिम इकबालच्या बाजूने निर्णय दिला कारण जेमिसनने कॅच घेतला पण तो पकडताना घेताना तो पूर्ण नियंत्रणात नव्हता, असं म्हणत थर्ड अंपायर वेन नाईट्सनी यांनी मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट असा दिलेला असतानाही फलंदाज नॉट आउट असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. किवी संघातील खेळाडूदेखील हा निर्णय पाहून स्तब्ध राहिले होते कारण पुन्हा रिप्लेमधून असे दिसत होते की झेल घेताना जेमीसन नियंत्रणात होता. तमिम 34 धावांवर फलंदाजी करत असताना जेमीसनने वादग्रस्त ड्रॉप कॅच पकडला. त्यानंतर, जेम्स नीशमकडून धावबाद होण्यापूर्वी सलामी फलंदाजाने 108 चेंडूंत 78 धावा फटकावल्या.

'सॉफ्ट-सिग्नल'च्या या वादग्रस्त निर्णयावर क्रिकेट विश्वातून पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सामन्याबद्दल बोलायचे तर बांग्लादेशने 6 बाद271 धावांपर्यंत मजल मारली, पण अखेर न्यूझीलंड संघ सामन्यात आघाडीवर राहिला. कर्णधार टॉम लाथमच्या नाबाद 110 धावांच्या जोरावर किवी संघाने 5 विकेट गमवून आणि 10 चेंडू शिल्लक असताना सहज विजय मिळवला. अशाप्रकारे यजमान संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.