NZ vs AUS 4th T20I 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी -20 आंतरराष्ट्रीय सामना वेलिंग्टन (Wellington) येथे खेळला गेला. सामन्यात असे काही घडले ज्यानंतर क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) फ्रँचायझी संघाला ट्रोल करत आहेत. आयपीएलच्या 14व्या मोसमासाठी झालेल्या खेळाडूंच्या मिनी लिलावात आरसीबीने (RCB) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला (Kyle Jamieson) 15 कोटी रुपयांत खरेदी केले आणि लिलावापूर्वी आरसीबीने रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा मर्यादित ओव्हरचा कर्णधार आणि सलामी फलंदाज आरोन फिंच (Aaron Finch) याचा समावेश होता. आणि जेमिसनच्या अखेरच्या ओव्हरमध्ये फिंचने चार षटकार ठोकले, ज्यानंतर आरसीबी संघ पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. फिंचने 55 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या. (T20 क्रिकेटमध्ये Rohit Sharma याच्या षटकारांचा रेकॉर्ड मोडत ‘हा’ न्यूझीलंड दिग्गज बनला नवीन सिक्सर किंग, पहा दोन्ही क्रिकेटर्सचे टी-20 फॉरमॅटमधील आकडे)
पहिल्या 40 चेंडूंत केवळ 40 धावा केल्यानंतर, फिंचने शेवटच्या 15 चेंडूचा सामना करत गियर बदलला आणि ऑस्ट्रेलियासाठी आणखी 39 धावा काढल्या. यादरम्यान, फिंच आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. फिंचने आजवर 103 षटकार ठोकले आहे. काईल जेमीसनबद्दल बोलायचे तर त्याची या संपूर्ण मालिकेत जोरदारधुलाई झाली. आणि या सामन्यात त्याने चार ओव्हरमध्ये 49 धावा दिल्या शिवाय त्याला एकही विकेट मिळाली नाही. जेमीसनच्या या कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी आरसीबीच्या सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली.
Aaron Finch smashes four sixes in the last over as Australia post 156/6 from their 20 overs.
Can the @BLACKCAPS chase this down?#NZvAUS | https://t.co/vHY5nULqOopic.twitter.com/ogtjThppnT
— ICC (@ICC) March 5, 2021
माजी आरसीबी फलंदाज सध्याच्या आरसीबी बॉलरची केली धुलाई!
Former RCB batsman smashing current RCB Bowler
— Pruthvi A (@PruthviA5) March 5, 2021
फिंचच्या चार षटकारानंतर RCB!
Meanwhile RCB - Finch out
Jamieson In 😂🤣
— Aash Mehta (@iamaashmehta) March 5, 2021
याच्यासाठी आरसीबीने कोटी रुपये दिले!
@RCBTweets Paid millions for the man!
— Nivas (@nibha23) March 5, 2021
आरसीबी प्रभाव!
RCB let go Finch and bought Jamieson
Classic RCB effect
— ndna (@ndna38685818) March 5, 2021
माजी आरसीबीयन आणि नवीन आरसीबीयन!
Ex rcbian hammering new rcbian !
— Heisenberg (@_Say_m_y_Name_) March 5, 2021
फिंच सूड घेत आहे
Aaron finch taking revenge over rcb for letting him go and whacking they're bowlers https://t.co/detrUaI0EP
— Vedant Gedela (@vedant_gedela) March 5, 2021
स्वाद आला!
Finch to RCB management after smashing 4 sixes in Jamieson over 😂 pic.twitter.com/YKjNV3LiC1
— Abhishek (@dj_abhiishek) March 5, 2021
यंदाच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या फिंचने ऑस्ट्रेलियाकडून आव्हानात्मक कामगिरी केली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोनिस यांनी वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर अनुक्रमे 18 आणि 19 धावांचे योगदान दिले. सामन्याबद्दल बोलायचे तर कांगारू संघाने दिलेल्या 156 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघ 106 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि 50 धावांनी संघाला पराभव पत्करावा लागला. यासह दोन्ही संघातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशा बरोबरीत आली आहे.