मुंबई: देशासाठी क्रिकेट खेळणाऱ्यांची ओळख केवळ क्रिकेटपटू अशी नाही, तर क्रिकेट खेळण्यासोबतच स्वत:ची वेगळी ओळख असलेले अनेक खेळाडू आहेत. शनिवारी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) तेलंगणा राज्यात डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र याआधीही अनेक भारतीय खेळाडूंची सरकारी पदांवर नियुक्ती झाली आहे. चला जाणून घेऊया त्या 8 भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जे सरकारी नोकरीत उच्च पदावर आहेत. (हे देखील वाचा: Mohammed Siraj DSP Look: सिंघम मोहम्मद सिराज! भारताचा वेगवान गोलंदाज दिसला डीएसपी अवतारात)
1- कपिल देव-(लेफ्टनंट कर्नल, भारतीय प्रादेशिक सेना)
कपिल देव ज्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्यांदा विश्वविजेते बनवले होते, त्यांना 2008 साली 'इंडियन टेरिटोरियल आर्मी' लेफ्टनंट कर्नल ही मानद रँक देण्यात आले. कपिल देव हे देशातील पहिले क्रिकेटपटू आहेत ज्यांना इंडियन टेरिटोरियल आर्मीने ही मानद रँक दिले आहे.
2- सचिन तेंडुलकर- (ग्रुप कॅप्टन, भारतीय हवाई दल)
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला 2010 साली भारतीय हवाई दलाने 'ग्रुप कॅप्टन' हा मानद दर्जा दिला होता. भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन बनणारा सचिन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे.
3- महेंद्रसिंग धोनी- (लेफ्टनंट कर्नल, इंडियन टेरिटोरियल आर्मी)
2011 मध्ये, भारतीय प्रादेशिक सैन्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लेफ्टनंट कर्नलचे मानद पद दिले. तेव्हापासून ते टेरिटोरियल आर्मीशी संबंधित आहेत. सुट्ट्यांमध्ये कोणत्याही सहलीला जाण्याऐवजी धोनी त्याच्या '106 इन्फंट्री बटालियन'मध्ये प्रशिक्षणासाठी जातो.
4- हरभजन सिंग-(डीएसपी, पंजाब पोलीस)
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगला 2013 मध्ये पंजाब पोलिसांनी डीएसपीची नोकरी दिली होती. भारताकडून 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळणाऱ्या भज्जीने एकूण 771 विकेट घेतल्या आहेत.
5- केएल राहुल-(सहायक व्यवस्थापक, आरबीआय)
टीम इंडियाचा स्टायलिश सलामीवीर केएल राहुलबद्दल लोकांना माहिती असेल की तो आरबीआयमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत आहे. आरबीआयने 2018 मध्ये राहुलला ही नोकरी दिली होती. तुम्ही राहुलला आरबीआयच्या जाहिरातींमध्येही पाहिले असेल.
6- जोगेंद्र शर्मा-(डीएसपी, हरियाणा पोलीस)
आपल्या शानदार गोलंदाजीने 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकणारा जोगेंद्र शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरियाणा पोलिसात डीएसपी म्हणून कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो हरियाणा पोलिसात कायमस्वरूपी कार्यरत होता.
7- युझवेंद्र चहल-(निरीक्षक, प्राप्तिकर विभाग)
सध्या भारताचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहलबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की तो 'आयकर विभागात' इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहे. चहलला 2018 मध्ये ही नोकरी देण्यात आली होती. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी चहल राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ चॅम्पियनही होता.
8- उमेश यादव- (सहायक व्यवस्थापक, आरबीआय)
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव देखील आरबीआय मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आरबीआयने 2017 मध्ये उमेशला नागपूर शाखेत असिस्टंट मॅनेजरची नोकरी देऊ केली होती.