
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना (ICC Chmapions Trophy 2025 Final) आज म्हणजेच 9 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma Funny Memes: रोहित शर्मा पुन्हा टॉस हरला; सोशल मीडियावर मजेदार मीम्सचा पाऊस)
New Zealand set India a target of 252 to win the ICC Champions Trophy 🎯https://t.co/hlOXjQx6aw | #INDvNZ pic.twitter.com/pRz70j7LE6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 9, 2025
डॅरिल मिशेलने 63 धावांची शानदार खेळी
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 50 षटकांत 7 विकेट गमावून 251 धावा केल्या. न्यूझीलंडकडून स्टार अष्टपैलू डॅरिल मिशेलने 63 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, डॅरिल मिशेलने 101 चेंडूत तीन चौकार मारले. डॅरिल मिशेल व्यतिरिक्त, मायकेल ब्रेसवेलने नाबाद 53 धावा केल्या.
वरुन-कुलदीपने घेतल्या 2 विकेट
टीम इंडियाकडून स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकांत 252 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद जिंकायचे आहे.