New Zealand National Cricket Team vs England National Cricket Team: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा कसोटी सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 101.4 षटकांत 453 धावांवर आटोपला. यासह यजमान संघाने इंग्लंडला 658 धावांचे लक्ष्य दिले. केन विल्यमसनने किवी संघासाठी दुसऱ्या डावात कारकिर्दीतील 33वे शतक झळकावले. विल्यमसनने 204 चेंडूत 156 धावांची खेळी केली. ज्यात 20 चौकार आणि 1 षटकार मारला होता. याशिवाय विल यंगने 60 धावा, डॅरिल मिशेलने 60 धावा, रचिन रवींद्रने 44 धावा, टॉम ब्लंडेलने 44 धावा, सँटनरने 49 धावा आणि कर्णधार टॉम लॅथमने 19 धावा केल्या. तर इंग्लंडकडून जेकब बेथेलने दुसऱ्या डावात सर्वाधिक 3 बळी घेतले. बेन स्टोक्स आणि शोएब बशीर यांनी 2-2 तर मॅथ्यू पॉट्स, गस ऍटकिन्सन आणि जो रुट यांनी 1-1 विकेट घेतली.
A day of New Zealand dominance - England have a mountain to climb!https://t.co/edmnRuX14i | #NZvENG pic.twitter.com/CeQ12sUN5G
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 16, 2024
तर इंग्लंडकडून जेकब बेथेलने दुसऱ्या डावात सर्वाधिक 3 बळी घेतले. बेन स्टोक्स आणि शोएब बशीर यांनी 2-2 तर मॅथ्यू पॉट्स, गस ऍटकिन्सन आणि जो रुट यांनी 1-1 विकेट घेतली. (हे देखील वाचा: Kane Williamson Century: हॅमिल्टनमध्ये केन विल्यमसनच्या बॅटमधून विक्रमी शतक, इंग्लंडविरुद्ध केला विश्वविक्रम)
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा पहिला डाव 97.1 षटकांत 347 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात मिचेल सँटनरने सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय टॉम लॅथमने 63 धावा, विल यंग 42 धावा, केन विल्यमसन 44 धावा, टॉम ब्लंडेल 21 धावा, रचिन रवींद्र 18 धावा आणि डॅरिल मिशेल 14 धावा केल्या. तर इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सने पहिल्या डावात सर्वाधिक 44 बळी घेतले. तर गस ऍटकिन्सनने 3 आणि ब्रेडेन कार्सने 2 बळी घेतले. कर्णधार बेन स्टोक्सला 1 बळी मिळाला.
347 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 35.4 षटकात 143 धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी खराब झाली. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 32 धावा केल्या. रूटशिवाय बेन स्टोक्सने 27 धावा, ऑली पोपने 24 धावा, जॅक क्रॉलीने 21 धावा आणि जेकब बेथेलने 12 धावा केल्या. तर न्यूझीलंडसाठी मॅट हेन्रीने पहिल्या डावात सर्वाधिक 4 बळी घेतले. तर विल्यम ओ'रुर्क आणि मिचेल सँटनर यांनी 3-3 बळी घेतले.