न्यूझीलंडच्या Lesbian महिला कर्णधारा एमी सैटरथवेट हिने दिली गुड न्यूज, लवकरच प्राप्त होणार मातृत्व; Twitter शेअर केली खास पोस्ट
एमी सैटरथवेट आणि ली तहुहु (Photo Credit: leatahuhu/Instagram)

न्यूझीलंडच्या महिला संघाची कर्णधार एमी सैटरथवेट (Amy Satterthwaite) आणि पत्नी आणि सहकारी ली तहुहु (Lea Tahuhu) हीच्यासह गरोदर आल्याची माहिती दिले आहे. शिवाय क्रिकेटमधून काही काळ विश्रांतीबद्दल देखील माहिती दिली. सैटरथवेट आणि तहुहु 2020 मध्ये आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील. सैटरथवेट आणि तहुहु, न्यूझीलंडच्या या समलिंगी जोडीने मार्च 2017 मध्ये लग्न केले. एमीने कधी पर्यंत पुनरागमन करणार याबद्दल काहीच सांगितले नसले तरी 2021 मध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी वेळेत संघात प्रवेश करण्याची आशा असल्याचे तिने सांगितले. क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा अर्थ म्हणजे एमी पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठी न्यूझीलंड संघाचा भाग नसेल. (SL vs NZ 2019: श्रीलंकाविरुद्ध टी-20 साठी टिम साऊथी करणार न्यूझीलंडचे नेतृत्व; केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट यांना डच्चू)

सैटरथवेटने ट्विटरद्वारे आपण गरोदर असल्याची माहिती दिली. सैटरथवेटने ही बातमी शेअर करत लिहिले की, "ली आणि मला ही बातमी आपणा सर्वांसोबत शेअर करताना आनंद होत आहे की पुढील वर्षाच्या सुरुवातीला मी आई होणार आहे. आमच्या आयुष्यातील ही एक खास वेळ आहे आणि आम्ही या नवीन अध्यायची वाट पाहू शकत नाची आतुरतेने वाट पाहत आहोत." एमी आणि ली यांनी त्यांच्या लग्न उघडकीस सांगितले की त्यांची टीममधील जवळजवळ प्रत्येकजण त्यांना एक जोडपे म्हणून ओळखतात.

32 वर्षीय सैटरथवेटने 2018 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी न्यूझीलंड संघाचे कर्णधार पद संभाळले. न्यूझीलंडसाठी सैटरथवेट आजवर 119 वनडे and 99 टी-20 सामने खेळली आहेत. तिने वनडेमध्ये मागोमाग चार शतक ठोकले आहेत. दुसरीकडे, 28 वर्षीय तहुहु महिला खेळातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तिने 116 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 114 विकेट्स घेतले आहेत.