(Photo Credit: Getty Image)

आयसीसी (ICC) विश्वकप च्या सामन्यात यजमान इंग्लंड (England) ने न्यूझीलंड (New Zealand) चा 199 धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. इंग्लंडच्या या विजयामुळे पाकिस्तान (Pakistan) चे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नावर पाणी पडले आहे. न्यूझीलंडच्या पराभवाने पाक संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळ जवळ संपुष्ठात आल्या आहेत. पाकिस्तानचा केवळ एकच सामना शिल्लक आहे. दरम्यान, इंग्लंडच्या विजयानंतर सोशल मीडियावर यूजर्स ने पाकिस्तानी संघ आणि चाहत्यांवर निशाणा साधला आहे. (PAK vs BAN: World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तान याला 'हे' करावे लागणार आहे, जाणून घ्या काय आहे गणित)

पाकिस्तानला विश्वकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक मोठ्या चमत्काराची गरज आहे. पाकिस्तानचा वेस्ट विंडीज (West Indies) विरुद्धच्या पहिल्या पराभवानंतर आणि त्यानंतर विजयानंतर, चाहत्यांनी एक आश्चर्यकारक गोष्ट शोधून काढली. यंदाच्या विश्वकपमध्ये पाक संघाचा प्रवास 1992 सारखाच होता. सुरुवातीला याकडे योगायोग म्हणून पाहिले गेले. आणि आता याच गोष्टीला लक्ष्य बनवून नेटकऱ्यांनी पाक संघाला ट्रोल केले आहेत.

पाकिस्तानकडून अलविदा वर्ल्ड कप 2019

दुर्दैवाने बांगलादेश 1992 मध्ये खेळाला नव्हता या सामन्याचा अंदाज लावण्यासाठी

आता 1992 ची नाही तर 1999 ची आठवण काढा

दरम्यान, पाकिस्तानचा विश्वकपमधील अंतिम सामना बांगलादेश शी शुक्रवारी लॉर्ड्स च्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात पाकचा कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक हारली आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर पडेल.