Yuzvendra Chahal (Photo Credits: Twitter / @yuzi_chahal)

भारतीय टीममधील एका खेळाडूचे नाव सोशल मिडियावर बरेच चर्चेत आहे ते म्हणजे युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal). भारतीय टीमच्या उत्कृष्ट स्पिनरच्या यादीत युजवेंद्रचेही नाव जोडले गेले आहे. अलीकडेच ICC Cricket World Cup 2019 मध्ये क्रिकेटच्या मैदानात आरामात झोपलेल्या युजवेंद्रची पोज सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाली होती. ज्यात नेटक-यांनी त्याच्यावर अनेक गमतीदार मिम्स देखील बनवले होते. त्याच्या पाठोपाठ आता युजवेंद्रने आपल्या ट्विटवर अकाउंटवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो आपल्या भुवया उडवताना दिसत आहे. युजवेंद्रचा 'Eyebrow Dance' म्हणून हा व्हिडिओ व्हायरल झाला नेटक-यांनी या व्हिडिओवर मजेशीर मिम्सचा भडिमार करण्यास सुरुवात केली आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे सामन्यासाठी रवाना झालेल्या युजवेंद्र ने विमानात मध्ये हा व्हिडिओ बनवला आहे. येत्या 8 ऑगस्टला हा सामना रंगणार आहे.

हेही वाचा- Yuzvendra Chahal Birthday Special: हे आहेत 'चहल टीव्ही' च्या पडद्यामागचे अविस्मरणीय क्षण, पहा हा (Video)

हे ट्विट आपले भारतीय खेळाडू (Indian Cricketers) कुठे आहेत यासाठी वेस्ट इंडिज दौ-यासाठी निघालेले भारतीय खेळाडू बनवत आहे. मात्र यातील युजवेंद्र चहल चे ट्विट आणि त्याने केलेला गमतीशीर व्हिडिओ खूप लवकर व्हायरल झाला.

चहल ने क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. जरी भारतीय टीम वर्ल्ड कप अंतिम सामन्यात स्थान पटकावू शकली नसली तरीही युजवेंद्र चहलची या सामन्यातील कामगिरी लक्षात घेता त्याची वनडेसाठी निवड करण्यात आली.