सिंगापूर ( Singapore) विरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नेपाळ (Nepal) क्रिकेट संघाचा कर्णधार पारस खडका ( Paras Khadka) ने एक नवा इतिहास रचला. 'हा' रेकॉर्ड करणे भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांना देखील करणे शक्य झाले नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना टी -20 मध्ये शतक ठोकणारा पारस कर्णधार बनला. सिंगापूरविरुद्ध 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने नाबाद 106 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पारसने हा विक्रम सिंगापूर आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) टी-20 तिरंगी मालिकामध्ये केला. पारसच्या या खेळीच्या जोरावर दुसर्या सामन्यात नेपाळने सिंगापूरला 9 गडी राखून पराभूत केले. 31 वर्षीय पारसने 52 चेंडूत शतक ठोकले. पारसने त्याच्या शतकी डावात 9 षटकार आणि 7 चौकार लगावले.
यापूर्वी फक्त पाच अन्य कर्णधारांनी टी -20 च्या पहिल्या डावात शतके ठोकले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच, माजी ऑस्ट्रेलियाई क्रिकेटपटू शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आणि रोहित यांचा समावेश आहे. पण, पारस एकमात्र असा फलंदाज आहे ज्याने दुसर्या डावात कर्णधार म्हणून शतक केले आहे.
रोहितने आंतरराष्ट्रीय टी -20 मध्ये सर्वाधिक चार शतकं केली आहे. तर, कर्णधार म्हणून सर्वाधिक २ शतकं केली आहेत.यातील पहिले शतक 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्ध इंदोरमध्ये आणि दुसरे वेस्ट इंडिजविरुद्ध 2018 लखनौमध्ये केले. दुसरीकडे, विराटने टी -20 मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. पण, विराटने अजून पहिले टी -20 शतक करणे बाकी आहे.