Mzansi Super League 2019: फलंदाजाला आऊट न दिल्याने क्रिस गेल याला लहान मुलासारखे रडताना पाहून अंपायरलाही आले हसू, पाहा Video
(Photo Credit: Twitter)

मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) मधील एका मॅचदरम्यान युनिव्हर्स बॉस क्रिस गेल (Chris Gayle)  याच्या एका जेस्चरमुळे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज चर्चेचा विषय बनला आहे. जोझी स्टार्स (Jozi Stars) आणि पार्ल रॉक्स (Paarl Rocks) यांच्यातील एका सामन्यादरम्यान स्टार्सचा सलामी फलंदाज गेल मॅचचे अंपायर हेन्री डेव्हिड यांच्याकडे विनवणी करताना दिसला. गेलने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कॅमेरून डेलपोर्ट याला बाद करण्यासाठी अंपायरकडे एलबीडब्ल्यूची अपील केली, पण अंपायरने ती धुडकावून लावली. अंपायरने नॉट आऊट म्हणत क्रिस गेल लहान मुलासारखा रडू लागला. गेलचा असा विनोद पाहून स्वतः अंपायरही त्याच्या हसूवर नियंत्रण ठेवू शकला नाही. (Mzansi Super League: दक्षिण आफ्रिकेच्या 'या' गोलंदाजाने दोन्ही हातांनी आश्चर्यचकित गोलंदाजी करत घेतल्या विकेट्स, पाहा Video)

पहिल्या ओव्हरच्या सहाव्या चेंडूवर ही घटना घडली. फलंदाजाने फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि फलंदाजाच्या स्टम्पसमोरच्या पायाला लागला. गेलने याच्यावर अंपायरकडे अपील केली, पण अंपायरने मान हलवत नॉट आऊट म्हण्टले. आपल्या संघासाठी गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी येत गेलला फारसे यश मिळू शकले नाही. 40 वर्षीय गेलला पहिल्याच षटकात यश मिळालं असतं पण अंपायरने फलंदाजाच्या बाजूने निर्णय दिला. जमैकनं पुन्हा एकदा अशा पद्धतीने अपील केलं की अंपायरला सुद्धा त्याच्याकडे पाहून हसायला आले. स्वयंघोषित ‘युनिव्हर्स बॉस’ ने रडत लहान मुलासारखा चेहरा बनविला. पाह या घटनेचा हा विनोदी व्हिडिओ:

130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉक्सने 17 व्या षटकातमध्ये लक्ष्य गाठले. सहाव्या ओव्हरमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या फलंदाज जेम्स विन्स याने यजमाना संघाकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. गेलने एकच ओव्हर टाकली आणि यात त्याने केवळ पाच धावा दिल्या. स्टार्सचा कर्णधार टेम्बा बावुमा याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.