इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या साखळी टप्प्यात मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) फक्त दोन सामने शिल्लक आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. पण या दरम्यान संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) कोणत्याही सामन्यात गोलंदाजी केलेली नाही. टीम इंडियाला (Team India) हार्दिककडून टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत मोठ्या आशा आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या फिटनेसबाबत अनिश्चितता वाढत जात आहे. 27 वर्षीय हार्दिकने आता स्वत: ला त्याच्या फिटनेसबाबत अपडेट दिले आहे. तो म्हणाला की तो लवकरच गोलंदाजी करेल. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने चाहत्यांना आणि समीक्षकांना आश्वासन दिले की तो लवकरच गोलंदाजी करणार आहे. मुंबईच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यापूर्वी प्रसारकांशी बोलताना हार्दिकने भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसारक दीप दासगुप्ता यांना सांगितले कीतो चेंडू हातात घेण्याच्या दिशेने काम करत आहेत. (Hardik Pandya Fitness Update: टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूने वाढवली विराट कोहलीची चिंता, गोलंदाजी कोचने दिला मोठा उपडेट)
“आएगा जल्दी. कोशिश पुरी है (मी लवकरच गोलंदाजी करेन. प्रयत्न चालू आहेत),” तो म्हणाला. पांड्याने आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी केली नाही कारण त्याच्या पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत आहे. यंदा मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या व्हाईट बॉल मालिकेदरम्यान त्याने अंतिम वेळी गोलंदाजी केली होती. हार्दिकला आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवडण्यात आले कारण मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाला होता की तो गोलंदाजी करेल. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी शुक्रवारी म्हटले होते की, हार्दिकने गोलंदाजीसाठी खूप जोर लावला तर त्याला बॅटने संघर्ष करावा लागू शकतो. तसेच बॅटने त्याच्या सध्याच्या फॉर्मबद्दल बोलायचे तर अष्टपैलूने पंजाब किंग्जविरुद्ध त्याच्या डावात दोन षटकार आणि चार चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या.
दुसरीकडे, शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या डबल-हेडर सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून चार विकेटने पराभव पत्करावा लागला होता. आयपीएलला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला आता उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. साखळी टप्प्यात मुंबईचा सामना मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादशी होईल.