Hardik Pandya Fitness Update: टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मुंबई इंडियन्सच्या अष्टपैलू खेळाडूने वाढवली विराट कोहलीची चिंता, गोलंदाजी कोचने दिला मोठा उपडेट
हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) 2021 च्या उत्तरार्धातील सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) चांगली ठरली नाही. संघाला सुरुवातीचे दोन्ही सामने गमवावे लागले. याशिवाय मुंबईला आणखी एक धक्का बसला. अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दोन्ही सामन्यांमध्ये खेळला नसून त्याच्या अनुपस्थितीमुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे केवळ रोहित शर्माच नाही तर आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) चिंताही वाढली असेल. कारण हार्दिक हा एकमेव वेगवान गोलंदाजीचा अष्टपैलू आहे ज्याचा वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीम इंडियामध्ये समावेश आहे आणि ज्या प्रकारे वेगवान गोलंदाजांना यूएईमध्ये मदत मिळत आहे. त्याच्याकडे पाहून त्याची दुखापत भारतीय संघाच्या  (Indian Team) अडचणीत भर घालणार असे दिसत आहे. या दरम्यान, मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड (Shane Bond) यांनी हार्दिकबद्दल एक मोठा अपडेट दिला आहे की लवकरच तो मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसू शकतो याचे संकेत दिले. (Mumbai Indians IPL 2021 Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचा टॉप-4 मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खडतर, प्लेऑफ गाठण्यासाठी लावावा लागणार पूर्ण जोर)

व्हर्च्युअल प्रेसरला संबोधित करताना बॉन्ड म्हणाले की, हार्दिक 'खेळण्याच्या जवळ आहे' पण संघ व्यवस्थापन त्याच्या मागे धावणार नाही कारण फ्रँचायझी त्याच्या कामाचा ताण सांभाळताना भारतीय संघाच्या गरजाही लक्षात ठेवत आहे. “हार्दिक रोहितप्रमाणे चांगले प्रशिक्षण घेत आहे. तो खेळण्याच्या जवळ येत आहे. आम्ही साहजिकच टीम इंडियाच्या गरजांसह आमच्या संघाच्या गरजा संतुलित करत आहोत,” हार्दिकच्या स्थितीबद्दल विचारल्यावर बॉण्ड मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. “या फ्रँचायझीने एक गोष्ट चांगली केली आहे ती म्हणजे आपल्या खेळाडूंवर लक्ष ठेवून केवळ या स्पर्धेचा प्रयत्न करणे आणि जिंकणे नव्हे तर पुढे होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर लक्ष ठेवणे. आम्हाला आशा आहे की हार्दिक पुढील सामन्यासाठी परत येईल. मी म्हटल्याप्रमाणे, त्याने आज प्रशिक्षित केले आहे आणि सर्व बाबतीत चांगले प्रशिक्षण दिले आहे,” न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज म्हणाले.

लक्षात घ्यायचे म्हणजे आयपीएल 2021 सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षणादरम्यान हार्दिक जखमी झाला होता. उर्वरित लीगसाठी तो गोलंदाजीसाठी तंदुरुस्त होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फक्त मोजण्याचे दिवस शिल्लक आहेत. अशा स्थितीत बीसीसीआयने फ्रँचायझींना विनंती केली आहे की वर्ल्ड कप संघात सहभागी असलेल्या कोणत्याही भारतीय खेळाडूला, जो जखमी असेल, त्याला लवकर मैदानात आणण्याची जोखीम घेऊ नये.