एप्रिल आणि मे हे महिने इंडियन प्रीमियर लीगला (Indian Premier League) समर्पित असतात. पण, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 17 मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएलही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) त्यांच्या बागेत आयपीएल खेळताना दिसत आहे. सोशल मीडियावर साक्षीने आपल्या बागेत दिसणार्या फुलांशी आयपीएल टीमच्या रंगांची तुलना करणारी एक लांब पण सुंदर कविता शेअर केली. तिने झेंडू आणि टेकोमासारख्या फुलांची तुलना सीएसकेशी केली आहे कारण ते संघाच्या जर्सी रंगासह पिवळ्या रंगाचे आहेत. शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) पर्पल क्वीन तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) भव्य इंडिगो आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) जर्सी रंगाच्या रंगाशी फ्रांगीपानी आणि गुलाब जुळतात तर तिने बौहिनियाची तुलना राजस्थान रॉयल्सशी (RR) केली आहे कारण ते फुलल्यानंतर गुलाबी तर मोहोर येण्यापूर्वी ते निळे असतात. (Coronavirus लॉकडाऊन दरम्यान रांची येथील घरी महेंद्र सिंह धोनी काय करत आहे? साक्षी धोनीने शेअर केलेला फोटो एकदा पहाच)
साक्षीने ही कविता तिच्या चाहत्यांसह आयपीएल रसिकांसाठी स्पष्टीकरणासह पोस्ट केली आहे. पोस्ट शेअर करत साक्षीने लिहिले, "आयपीएल प्रेमींसाठी स्पष्टीकरणांसह पुन्हा पोस्ट करते." तिने आपल्या घराबाहेरच्या लॉनमध्ये फुलांचे सुंदर रंग आणि हिरव्यागार बाग आपले सुंदर क्रिकेट विश्व उभारले आहे.
कविता येथे वाचा
कवितेच्या शेवटी, साक्षीने कोरोना व्हायरसशी झुंज देत असलेल्या सर्व डॉक्टरांना सलाम केले. अलीकडेच धोनी आपली मुलगी जिवाला त्यांच्या मोठ्या बागेत बाईक राईडवर घेऊन जाताना दिसला. लॉकडाउनमध्ये धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी जिवासोबत रांचीमधील त्याच्या फार्महाऊसमध्ये वेळ घालवत आहे. साक्षी अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉकडाउनमध्ये आपल्या घरात काय होत आहे याची झलक म्हणून काही व्हिडिओज आणि फोटोज शेअर करते.