MS Dhoni Seat At Wankhede Stadium: एमएस धोनीने वानखेडे स्टेडियममध्ये ज्या जागी मारला 2011 वर्ल्ड कप विजयी सिक्स, तिथे त्याला मिळू शकते लाइफटाइम सीट
एमएस धोनीचा 2011 वर्ल्ड कप विजयी सिक्स (Photo Credit: YouTube)

माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) त्याच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) शहरातील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) त्यांच्या नावाचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 2011 वानखेडे स्टेडियमवर धोनीच्या नेतृत्वात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने श्रीलंकेला रोमांचक अंतिम सामन्यात 6 गडी राखून पराभूत केले होते. धोनीनेच अंतिम सामन्यात 49 व्या षटकात श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराच्या चेंडूवर शानदार षटकारासह भारतासाठी विश्वचषकातील विजयावर शिक्कामोर्तब केले. एमसीएच्या अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या सदस्याने आता एका जागेला धोनीचे नाव देण्याचा विचार करण्यासाठी पत्र लिहिले आहे, जिथे त्याने वानखेडे स्टेडियममध्ये 2011 वर्ल्ड कप मारलेला विजयी षटकार पडला. (MS Dhoni fan Chacha Chicago Retires: एमएस धोनीचे पाकिस्तानी 'जबरा फॅन' चाचा शिकागो देखील निवृत्त, रांचीला जाऊन भेटण्याची आहे इच्छा)

‘द इंडियन एक्स्प्रेस’ च्या एका अहवालानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशन अ‍ॅपेक्स कौन्सिलचे सदस्य, अजिंक्य नाईक यांनी सोमवारी एमसीएला पत्र लिहून वर्ल्ड कप विजेता कर्णधार धोनीला ट्रिब्युट म्हणून एका सीटला नाव देण्यास सांगितले. “भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या अफाट योगदानाबद्दल कृतज्ञता व ट्रिब्यूट म्हणून, एमसीए त्याच्या नावावर कायमस्वरुपी जागा जागा देऊ शकेल, ज्या स्थानावर त्याचे विश्वचषक जिंकणारे प्रसिद्ध षटकार चेंडू पडला. 2011 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीने मारलेला बॉल कोणत्या ठिकाणी पडला, कोणत्या सीटवर उडत होता ते आम्ही शोधू शकतो,” नाईक यांनी दि इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या पत्रात लिहिले.

एमसीए अ‍ॅपेक्स कौन्सिल आज मंगळवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा करणार असल्याचं म्हण्टलं जात आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर संपूर्ण स्टॅन्ड नव्हे तर जागा निश्चित केली जाईल. धोनीच्या नंबर आधीपासूनच त्याच्या गावी रांचीतील जेएससीए स्टेडियमवर त्याला समर्पित स्टॅन्ड आहे. 2007 टी-20विश्वचषक, 2011 विश्वचषक आणि 2017 चँपियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला विजयासह अनेक अविस्मरणीय विजय मिळवून देणारा धोनीला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते.