एमएस धोनी फोटो आणि एचडी वॉलपेपर (Photo Credit: Getty)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयलच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला 16 धावांनी पराभूत केले आहे. मात्र, या सामन्यात अखेरच्या षटकात तुफान फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र धोनीने (MS Dhoni) त्याच्या चाहत्यांची मन जिंकली आहेत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलच्या सामन्यानंतर बराच काळ महेंद्रसिंह धोनी मैदानापासून दूर होता. तब्बल 437 दिवसानंतर मैदानात आलेल्या महेंद्रसिंह धोनीला पुन्हा त्याच्या अंदाजमध्ये खेळताना पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  तसेच राजस्थान रॉयलच्या विजयापेक्षा सध्या सोशल मीडियावर महेंद्र धोनीचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे.

महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या काही षटाकांत तुफान फलंदाजी करत आपल्या संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून महेंद्रसिंह धोनी मैदानापासून दूर होता. आयपीएल 13 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईच्या सुपर किंग्जच्या संघाने विजय प्राप्त केला. मात्र, महेंद्रसिंह धोनीला केवळ दोनच चेंडू खेळता आले आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याची फलंदाजी पाहायला मिळाली नव्हती. मात्र, आजच्या सामन्यात धोनीने अखेरच्या षटकात आपल्या शैलीत फटकेबाजी करत चाहत्यांना खुश केले आहे. ज्यामुळे ट्विटरवर धोनी ट्रेंड सुरु आहे. हे देखील वाचा- Jofra Archer’s Old Tweet Goes Viral: चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध एका ओव्हरमध्ये 4 षटकार मारल्यानंतर जोफ्रा आर्चर याचे जुने ट्विट व्हायरल

आयपीएलचे ट्विट-

नाणेफेक जिंकत धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पदार्पण करणाऱ्या मुंबईकर यशस्वी जैस्वालला स्वस्तात माघारी धाडत चेन्नईने चांगली सुरुवात केली. मात्र, यानंतर मैदानावर आलेल्या संजू सॅमसनने स्टिव्ह स्मिथच्या साथीने चेन्नईच्या गोलंदाजीची धुलाई केली. दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत दोन्ही फलंदाजांनी राजस्थानला सुस्थितीत आणले. सॅमसनने 19 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. विशेषकरुन पियुष चावलावर दोन्ही फलंदाजांनी हल्लाबोल केला. एन्गिडीने सॅमसनला बाद करुन राजस्थानची जोडी फोडली आणि राजस्थानच्या डावाला गळती लागली.