Jofra Archer’s Old Tweet Goes Viral: चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध एका ओव्हरमध्ये 4 षटकार मारल्यानंतर जोफ्रा आर्चर याचे जुने ट्विट व्हायरल
राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलता चौथा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करायला आलेल्या राजस्थानचा संघाने चेन्नई सुपर किंग्जच्या संघासमोर 217 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलता चौथा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करायला आलेल्या राजस्थानचा संघाने चेन्नई सुपर किंग्जच्या संघासमोर 217 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. ज्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुन्गिसानी एन्गिडीने टाकलेले अखेरचे षटक चेन्नईच्या संघाला चांगलेच महागात पडले आहे. अखेरच्या षटकांत जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीची अधिक चर्चा आहे. यामुळे त्याने गेल्या काही वर्षापूर्वी केलेल्या ट्विट पुन्हा व्हायरल होऊ लागले आहे.
जोफ्रा आर्चरने 9 जानेवारी 2015 एक ट्विट केले होते. ज्या ट्विटमध्ये त्याने 6666 असे लिहले होते. मात्र, या ट्विटचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसह अनेकांना पडला होता. मात्र, आज चेन्नई सुपर किंग्जला विरुद्ध सुरु असलेल्या अखेरच्या षटकात त्याने 4 षटकार लगावले. त्यानंतर त्याचे चाहते आता या साडेपाच वर्षांहून अधिक जुन्या ट्विटला रिप्लाय करत आहेत. हे देखील वाचा- Fastest Fifties In IPL History: केएल राहुल, युसुफ पठाण, सुनील नारायण यांच्यासह संजू सॅमसन याचाही वेगवाग अर्धशतकाच्या यादीत समावेश; येथे पाहा संपूर्ण यादी
ट्वीट-
I count six shots
— Jofra Archer (@JofraArcher) January 25, 2015
ट्विट-
6666
— Jofra Archer (@JofraArcher) January 9, 2015
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात जोफ्रा आर्चरने 8 चेंडूमध्ये 27 धावा केल्या. ज्यामुळे राजस्थानच्या संघाला 216 धावापर्यंत मजल मारता आली आहे. महत्वाचे म्हणजे, जोफ्रा आर्चर हा नेहमी ट्विटर सक्रिय असल्याचे आपण पाहिले. त्याने केलेले जुने ट्विट नेहमी व्हायरल होताना आपण पाहिले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2020 11:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

