इंडियन प्रीमियर लीग 13 च्या हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शारजाह मैदानात सुरु आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान संघाचा युवा फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या फलंदाजीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात संजू सॅमसनने केवळ 19 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले आहे. ज्यामुळेकेएल राहुल, युसुफ पठाण, सुनील नारायण यांच्यासह त्याचाही वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत 14 बॉलमध्ये अर्धशतक ठोकणारा किंग्ज एलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल अव्वल स्थानावर आहे. तर, जाणून घेऊया वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या खेळांडूंची संपूर्ण यादी.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा आयपीएल युएईत खेळवण्यात येत आहे. प्रेक्षकांनाही यावेळी मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, तरीदेखील प्रेक्षकांच्या आनंदात कोणतीही कमतरता दिसत आहे. प्रत्येकजण घरबसल्या यंदाचा आयपीएलचा आनंद लुटत आहेत तसेच गेल्या काही दिवसांपासून मैदानाबाहेर असलेले खेळाडूदेखील अधिक उत्साहाने खेळताना दिसत आहेत. हे देखील वाचा- Virat Kohli And Shahrukh Khan Photo: भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली शाहरूख खान याच्याशी भर मैदानातच भिडला? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो मागचे सत्य घ्या जाणून
आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे-
1) केएल राहुल- 51 (14) विरुद्ध (दिल्ली कॅपिटल्स, 2014)
2) युसुफ पठाण- 72 (15) विरुद्ध (सनराइजर्स हैदराबाद, 2014)
3) सुनी नारायण- 54 (15) विरुद्ध (रॉयल चॅलेंजर बंगळरू, 2017)
4) सुरेश रैना- 87 (17) विरुद्ध (किंग्ज इलेव्हन पंजाब, 2014)
5) क्रिस गेल- 175 (17) विरुद्ध (पुणे वॉरिअर्स, 2013)
6) हार्दिक पांड्या- 91 (17) विरुद्ध ( कोलकात नाईट राईडर्स, 2019)
7) अॅडम गिलक्रिस्ट- 85 (17) विरुद्ध (दिल्ली कॅपिटल्स, 2009)
8) क्रिस मॉरिस- 82 (17) विरुद्ध (गुजरात लाईन्स, 2016)
9) ईशान किशन- 62 (17) विरुद्ध (कोलकाता नाईट राईडर्स, 2018)
10) कायरन पोलार्ड- 51 (17) विरुद्ध (कोलकाता नाईट राईडर्स, 2016)