
IND vs AUS 2nd T20I: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (Australia Vs India) यांच्यातील 3 सामन्याच्या मालिकेतील दुसरा टी-20 सामना उद्या (6 डिसेंबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. दरम्यान, ही मालिका वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मालिका आपल्या नावावर करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. पहिल्या टी-20 सामन्यात उत्कृष्ट कामगिरी जोरावर 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या युजवेंद्र चहल याच्याकडे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspris Bumrah) याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. टी-20 मध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूच्या यादीत जसप्रीस बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, युजवेंद्र चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल स्थान गाठण्यासाठी युजवेंद्र चहल केवळ दोन विकेट्स दूर आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला टी-20 सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हलवर येथे खेळला गेला होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 11 धावांनी पराभूत करत 3 सामन्याच्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात युजवेंद्र चहल आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या सामन्यात चहलने 3 विकेट घेत टी-20 सामन्यात 58 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याने 43 डावांत 58 विकेट्स मिळवले आहेत. टी-20 सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने 49 डावांत 59 विकेट पटकावल्या आहेत. जर उद्याच्या सामन्यात चहलने दोन विकेट्स पटकावले तर, तो अव्वल स्थानी झेप घेणार आहे. हे देखील वाचा- T20I Squad: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतून रविंद्र जडेजा आऊट, Shardul Thakur इन
टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला तीन सामनच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला आहे तसेच या दौऱ्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने 12 हजार धावांचा टप्पा गाठून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. याच दौऱ्यावर आता युजवेंद्र चहल यालाही नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे.