Most Followed IPL Team on Instagram: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) खेळाडूंप्रमाणेच फ्रँचायझींचा देखील मोठा फॅन बेस आहे. प्रत्येक संघात डाय-हार्ड चाहत्यांचा सेट असतो. काही चाहते स्टेडियममध्ये आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहचतात तर काही चाहते घरून डिजिटल माध्यमातून आपल्या आवडत्या टीमचे समर्थन करतात. आजच्या युगात, सोशल मीडिया हे एक आवश्यक साधन आहे आणि आयपीएल संघ आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी त्याचा चांगला वापर करतात. आठ आयपीएल संघांपैकी प्रत्येक संघ- चेन्नई सुपर किंग्स (CSK), दिल्ली कॅपिटल्स (DC), किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP), कोलकाता नाइट रायडर (KKR), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB), सनरायझर्स हैदराबाद (SRH) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहे. फोटो-शेअरिंग अॅप- इन्स्टाग्रामवर देखील आयपीएलचे हे सर्व संघ बरेच सक्रिय आहेत आणि त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही चांगली आहे. (IPL 2020 Update: UAE येथे आयपीएलला सरकारची तत्त्वत: मान्यता, बीसीसीआयचा दावा; फ्रँचायझींकडून खेळाडूंची क्वारंटाइन प्रक्रिया सुरू)
संबंधित टीम अकाउंट्स ऑफ सीझनमध्येही चाहत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात आणि फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात. दरम्यान, संयुक्त अरब अमिराती मध्ये (यूएई) होणार असलेल्या आयपीएल 2020 आवृत्तीच्या अगोदर आपण या संघाच्या प्रत्येक इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकूया आणि कोणत्या फ्रेंचायझीचे सर्वात जास्त फॉलो केले जाते आणि लोकप्रिय आहे हे पाहूया:
नंबर 1: मुंबई इंडियन्स, फॉलोअर्स 4.7 मिलियन
मुंबई इंडियन्स हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअन आयपीएल संघ आहे यात काही आश्चर्य नाही. चार वेळच्या आयपीएल चॅम्पियनचे आजवर 4.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने सर्वाधिक चार आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत.
नंबर 2: चेन्नई सुपर किंग्ज, फॉलोअर्स 4.3 मिलियन
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज 4.3 लाख फॉलोअर्ससह इंस्टाग्रामवर दुसर्या क्रमांकावर आहे. सीएसकेने आजवर तीन आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत आणि सुपर किंग्जच्या लोकप्रियतेत धोनीचेही काही गुण जोडले जातात.
नंबर 3: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, फॉलोअर्स 3.7 लाख
गेल्या तीन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरले असून आयपीएलचे जेतेपद न जिंकूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अद्यापही सर्वात फॉलो होणाऱ्या संघांपैकी एक आहे. आरसीबीच्या लोकप्रियतेचे श्रेय त्यांचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांना दिली जाऊ शकते.
नंबर 4: कोलकाता नाइट रायडर्स, फॉलोअर्स 1.6 लाख
आश्चर्य म्हणजे बॉलीवूड स्टार शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सने चौथे स्थानावर आहे. दोन वेळा आयपीएल विजेत्यांचे 1.6 लाख फॉलोअर्स आहेत.
नंबर 5: सनरायझर्स हैदराबाद, फॉलोअर्स 1.4 लाख
इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचा विचार केला तर सनरायझर्स हैदराबाद पाचव्या क्रमांकावर केकेआरच्या अगदी मागे आहे. एकदा आयपीएलचे जेतेपद मिळविणार्या एसआरएचचे इंस्टाग्रामवर 1.4 लाख फॉलोअर्स आहेत.
नंबर 6: दिल्लीची कॅपिटल्स, फॉलोअर्स 1.3 लाख
दिल्ली संघ अद्याप आयपीएल विजेतेपद न जिंकणारा दुसरा संघ आहे. दिल्लीस्थित फ्रँचायझीने मागील वर्षांपासून दिल्ली डेअरडेव्हिल्स वरून आपले नाव बदलले आहे. 1.3 लाख फॉलोअर्ससह दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे.
नंबर 7: किंग्ज इलेव्हन पंजाब, फॉलोअर्स 1.2 लाख
इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत प्रीती झिंटाच्या सह-मालकीची किंग्ज इलेव्हन पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. आरसीबी आणि डीसीप्रमाणेच पंजाबने देखील अद्याप एकदाही आयपीएल विजेतेपद जिंकलेले नाही. मोहाली-स्थित फ्रँचायझीचे 1.2 लाख फॉलोअर्स आहेत.
नंबर 8: राजस्थान रॉयल्स, फॉलोअर्स 927 हजार
फॉलोअर्सआयपीएलचे पहिले चॅम्पियन्स राजस्थान टीमचे आयपीएल संघांमध्ये इंस्टाग्रामवर सर्वात कमी फॉलोअर्स आहेत. रॉयल्सचे 9,27,375 फॉलोअर्स आहेत. कदाचित 2020 मध्ये विजेतेपद मिळविणे त्यांना अधिक फॉलोअर्स मिळविण्यात आणि 'मिलियन फॉलोअर्स' क्लबमध्ये प्रवेश करण्यास मदत करेल.
यंदा आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी होणार असून 10 नोव्हेंबरला अखेरचा सामना खेळला जाईल. कोरोना व्हायरस महामारीमुळे रिक्त स्टेडियममध्ये सामने आयोजित केले जातील, आणि बहुतेक चाहत्यांना घरीच बसून लीगचा आनंद घ्यावा लागेल.