IPL च्या सर्वात महागड्या अष्टपैलू खेळाडूने सोडली राष्ट्रीय संघाची साथ, म्हणाला - ‘माझे खेळण्याचे दिवस संपले’
क्रिस मॉरिस आणि जयदेव उनाडकट (Photo Credit: PTI)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा (South Africa Cricket Team) अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने  (Chris Morris) आपल्या देशाच्या क्रिकेट संघाची साथ सोडली आहे. अष्टपैलू खेळाडूने सांगितले की तो औपचारिक निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता नाही, परंतु त्याने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला (Cricket South Africa) त्याच्या हेतूबद्दल माहिती दिली आहे आणि बोर्डाला याची जाणीव आहे की तो यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाकडून खेळणार नाही. मॉरिस म्हणाला की भविष्यात तो आपल्या देशाची जर्सी घालून क्वचितच खेळायला येईल. टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी त्याची Proteas संघात निवड झाली नव्हती. मॉरिसने स्पोर्ट्सकीडा वेबसाइटशी केलेल्या संभाषणात सांगितले की, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी राष्ट्रीय संघात खेळण्याची चर्चा झाली होती. मॉरिसने स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अधिकृत निवृत्ती जाहीर न करण्याचा त्यांचा निर्णय वैयक्तिक निर्णयावर आधारित होता. (T20 World Cup 2021, SA vs WI: वर्णद्वेषविरुद्ध मैदानात गुडघे टेकणार दक्षिण आफ्रिका, Quinton de Kock ने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्यास दिला नकार!)

उल्लेखनीय म्हणजे मॉरिस हा आयपीएल 2021 लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांत खरेदी केले होते. आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात त्याची कामगिरी खूप चांगली होती. मात्र उत्तरार्धात त्याला विशेष काही करता आले नाही. या हंगामापूर्वी तो आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीचा भाग होता. त्यावेळी त्याला 10 कोटी रुपये मिळाले होते. त्याने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली पण संघाने त्याला रिलीज केले. मॉरिस पहिल्यांदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळला होता. येथून निघाल्यानंतर तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (कॅपिटल्स) आणि राजस्थान रॉयल्सचा भाग बनला.

नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 2021 हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या मॉरिसने दक्षिण आफ्रिकेसाठी चार कसोटी, 42 वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. जुलै 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने अखेरचे दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये त्याने अनुक्रमे 12, 48 आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत. मॉरिस पुढे म्हणाला की, तो आता देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे.